राशीभविष्य - आजचा दिवस कसा जाईल ?

 आजचा दिवस कसा जाईल ?

Updated: May 1, 2020, 08:24 AM IST
राशीभविष्य - आजचा दिवस कसा जाईल ? title=

मेष : आज आनंद राहाल. घरातही आनंदी वातावरण असेल. तुम्ही आजचा दिवसा आराम करण्यात घालवाल. त्यामुळे कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. घरगुती कामाचा ताण कमी होईल.

वृषभ : बोलताना काळजी घ्यावी लागेल. कोणी दुखावणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. मित्रांशी गप्पा गोष्टीत रमाल.

मिथुन : आजचा दिवस आरामात जाईल. निवांत वेळ मिळेल. चांगले पुस्तक वाचण्यासाठी वेळ मिळले. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. काही लोकांपासून थोडे लांबच राहा. 

कर्क : आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करता. यामुळे तुम्हाला भविष्यात एखाद्याची चांगली मदत होऊ शकते. असे करताना एखाद्यावर जास्त विश्वास ठेवू नका, त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

सिंह : आजची सुट्टी आरामत घालवाल. कामाचा ताण कमी असेल. तुम्ही एखाद्याच्या कौतुकास पात्र व्हाल.

कन्या :  आज कुटुंबाला वेळ द्याल. घरातील मोठ्यांचे सहकार्य लाभेल, त्यामुळे तुम्ही आनंदी असला.

तूळ:   स्वभावात काहीसा हट्टीपणा आहे. तो तुम्ही दूर केला पाहिजे. आज घरात कामाची गडबड असेल. तुम्हाला दुसऱ्यांना वेळ देता येणार नाही. त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

वृश्चिक : आज मित्रांना भेटचा योग आहे. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.  

धनु : कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. कामातून चांगला धनलाभ होईल. गप्पांमध्ये गुंग व्हाल. 

मकर : आपण आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे.  राग तुमच्यासाठी चांगला नाही. त्यामुळे तुमचेच नुकसान होण्याची शक्यता आहे.

कुंभ : कौटुंबिक प्रश्न सहज हाताळाल. त्यामुळ तणाव दूर होईल. नको ती काळजी करत बसू नका.

मीन : बोलताना शब्द जपून वापरावेत. गरज असेल तरच खर्च करावा.