अवघ्या १५ दिवसांत उभारलं बीकेसीचं कोविड सेंटर

May 18, 2020, 19:51 PM IST
1/4

वांद्रे कुर्ला संकुल येथे नगरविकास विभागाच्यावतीने १००० खाटांचं कोविड-१९ केंद्र उभारण्यात आलं आहे. या केंद्रात खाटांसोबत ऑक्सिजन पुरवठ्याचीदेखील सोय आहे.

2/4

सव्वा लाख चौरस फूटांवर एमएमआरडीएने 15 दिवसांहून कमी कालावधीत हे कोविड-१९ केअर सेंटर तयार केलं आहे. या सेंटरचं २ मे रोजी काम सुरु करण्यात आलं होतं, ते १६ मे रोजी पूर्ण करण्यात आलं.

3/4

या ठिकाणी रुग्णांसाठी निवास, ऑक्सिजन, चाचणी घेण्याची सुविधा, स्टोरेज सुविधेसह पॅथॉलॉजी, ईसीजी आणि एक्स-रे मशीनदेखील आहे. दररोज सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण रुग्णालयात दिलं जाणार आहे. स्वच्छतागृहं, स्नानगृहं यासह इतर आवश्यक सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 

4/4

देशातील हे पहिलं खुल्या जागेवरील रुग्णालय (ओपन हॉस्पिटल) आहे. सर्व हवामान परिस्थितीचा विचार करुन या केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. केंद्रात पावसाळ्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.