Rajkummar Rao च्या नवीन सिरीजमध्ये दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची झलक

समीक्षकांच्या प्रशंसनीय कामगिरीपासून ते बॉक्स ऑफिसच्या यशापर्यंत राजकुमार रावने साकारलेल्या प्रत्येक भूमिका हटके होत्या. पॉवरहाऊस अभिनेता आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी तयार होताना दिसतोय.

Updated: Aug 2, 2023, 07:18 PM IST
Rajkummar Rao च्या नवीन सिरीजमध्ये दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची झलक title=

मुंबई : राजकुमार राव हा अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि त्याने साकारलेल्या पात्रांना पूर्णपणे न्याय देऊन नेहमीच या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. "गन्स अँड गुलाब्स"मध्ये, त्याच्या हटके कॉमेडी थ्रिलरमध्ये राजकुमार एका नव्या अवतारात चमकत आहे त्याच्या या लूकची चर्चा तर होत आहेच पण सोबतच त्याच्या या भूमिकेसाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत. 

या बहुप्रतिक्षित सीरिजचा ट्रेलर लाँच झाला असून एक उत्तम कॉमेडी बघायला मिळणार असल्याचा चर्चा सोशल मीडियावर बघायला मिळतायेत. राज आणि डीके दिग्दर्शित या आगामी कॉमेडी थ्रिलरसाठी चाहते उत्सुक आहेत. दुलकर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशनसोबत अविश्वसनीय प्रतिभावान राजकुमार राव यांच्या भूमिका यात अनुभवयाला मिळणार आहेत. 

90 च्या दशकात सेट केलेली ही थरारक अॅक्शन आणि विनोदाच्या रोलर-कोस्टर राइड असलेली कॉमेडी असणार आहे या सगळ्यात एक विषय चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजकुमार रावचा नवीन लूक! मोठे केस, एक चकचकीत जॅकेट असा अभिनेत्याचा यात लूक पहायला मिळतोय. याचबरोबर एक विनोदी स्वभाव जो अप्रतिम दिसत आहे. 

नेटफ्लिक्सने २०२३ च्या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये समाविष्ट असलेल्या गन्स अँड रोझेसचा ट्रेलर रिलीज केला आहे. राज आणि डीके दिग्दर्शित अॅक्शन आणि कॉमेडीचे मिश्रण असलेल्या गन्स अँड रोजेसमध्ये राजकुमार राव, दुल्कर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन देवय्या मुख्य भूमिकेत दिसत आहेत. यासोबतच दिवंगत अभिनेते सतीश कुमार यांचीही झलक या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. 90 च्या दशकातील प्रसिद्ध गँगस्टर्सची कथा 18 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

गन्स एंड गुलाब्स (Guns and Gulaabs) २.५१ सेकंदाच्या ट्रेलरच्या पहिल्याच सीनमध्ये अॅक्शन आणि कॉमेडीचं जबरदस्त मिश्रण पाहायला मिळतंय. त्यानंतर  अभिनेता सतीश कौशिकचा आवाज ऐकू येतो… गुलाबगंजच्या पवित्र भूमीत आपले स्वागत आहे. त्याचनंतर सतीश कौशिकची झलक पाहायला मिळते.

समीक्षकांच्या प्रशंसनीय कामगिरीपासून ते बॉक्स ऑफिसच्या यशापर्यंत राजकुमार रावने साकारलेल्या प्रत्येक भूमिका हटके होत्या. पॉवरहाऊस अभिनेता आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी तयार होताना दिसतोय. प्रेक्षक त्याच्या या सिरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. गन्स अँड गुलाब्समधील राजकुमार रावचे अनोखं  पात्र मनोरंजनासाठी सज्ज आहे.