'भक्षक'नंतर आता 'या' बॉलिवूड चित्रपटात दिसणार सई ताम्हणकर! अभिनेत्रीसाठी 2024 ठरतंय खास

Sai Tamhankar New Bollywood Movie : 'भक्षक' या चित्रपटानंतर सई ताम्हणकर दिसणार 'या' बॉलिवूड चित्रपटात! प्रतीक गांधीसोबत शेअर करणार स्क्रीन

दिक्षा पाटील | Updated: May 4, 2024, 06:29 PM IST
'भक्षक'नंतर आता 'या' बॉलिवूड चित्रपटात दिसणार सई ताम्हणकर! अभिनेत्रीसाठी 2024 ठरतंय खास title=
(Photo Credit : Social Media)

Sai Tamhankar New Bollywood Movie : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरसाठी 2024 हे वर्ष हे खास ठरतंय यात कोणतीही शंका नाही. या वर्षी सई भक्षक या हिंदी या चित्रपटात दिसली. या वर्षी सई बॉलिवुड मध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही. 'आंतरराष्ट्रीय फायर फायटर' दिनाच्या निमित्तानं सईनं 'अग्नी' या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. 

या प्रोजेक्ट बद्दल सई म्हणाली, "एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. अग्नी हा प्रोजेक्ट्स नक्कीच माझ्यासाठी खूप खास आहे. एवढ्या बड्या स्टार्स सोबत काम करण्याचा अनुभव खूप कमालीचा होता. आज आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिवशी अग्नी चित्रपटाचं पोस्टर शेयर करताना आम्हाला खूप आनंद होतोय. हा चित्रपट खूप वेगळा असणार असून तो नक्कीच प्रेक्षकांना एक वेगळा संदेश देऊन जाणार आहे " दरम्यान, सई शिवाय चित्रपटात प्रतीक गांधी, जितेंद्र जोशी, दिवेंद्यू , सयामी खेर अशी तगडी स्टाकास्ट दिसणार आहेत. तर सईसाठी हा प्रोजेक्ट खास आहे. सईनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यावरुन सईला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई 'डब्बा कार्टेल' मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर 'डब्बा कार्टेल' रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

हेही वाचा : संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'मध्ये काम करण्यासाठी कोणी घेतलं सगळ्यात जास्त मानधन?

एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. 2024 मध्ये सईच्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी आहे आणि हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय. सई विषयी बोलायचे झाले तर तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.