राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच Allu Arjun च्या चाहत्यांनी साजरं केलं यश पण हेटर्स म्हणाले, 'आम्हाला मान्य नाही'

Allu Arjun National Awards: अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun Father) चाहत्यांनी काल, 24 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काहींनी यावेळी अल्लू अर्जूनला ट्रोलही केलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 25, 2023, 09:02 AM IST
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच Allu Arjun च्या चाहत्यांनी साजरं केलं यश पण हेटर्स म्हणाले, 'आम्हाला मान्य नाही' title=
Allu Arjun fans celebrated the National Awards 2023 but the haters disagreed news in marathi

Allu Arjun : काल 24 ऑगस्ट रोजी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट, क्रिती सनन, अभिनेता अल्लू अर्जून यांनी या पुरस्कारांवर सर्वात्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रीचे नावं कोरले आहे. Pushpa साठी अभिनेता अल्लू अर्जूनला सर्वात्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जूनच्या घराबाहेरही चाहत्यांनी जल्लोष करायला सुरूवात केली आहे. त्यांच्या घराबाहेर अक्षरक्ष: त्यांच्या चाहत्यांनी फटाके फोडत अल्लू अर्जूनला मिळालेल्या पुरस्काराचा जल्लोष केला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी आपल्या घराबाहेर येत अल्लू अर्जूननं स्वत:हून हात जोडून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. सध्या अल्लू अर्जूनची सर्वच जत्रा पाहायला मिळते आहे. आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराचे अल्लू अर्जूननं सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

अल्लू अर्जूननं आपल्या या 'पुष्पा' सिनेमासाठी 45 कोटी रूपये मानधन घेतले होते. सोबतच आता राष्ट्रीय पुरस्कारानं त्याच्या या भुमिकेच्या लोकप्रियतेत अधिकच वाढ झाली आहे. त्याचा प्रत्यय या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून कळून येते आहे. यावेळी अनेक चाहत्यांनी अल्लू अर्जूनला मिठीही मारली होती. त्यातून यावेळी दिग्दर्शक सुकूमार यांनाही त्यानं मिठी मारली. आपल्या वडीलांनीही यावेळी आनंद झालेला पाहून अल्लू अरविंद यांनाही आपल्या लेकाचे कौतुक करावेसे वाटले आहे. त्यांनीही अल्लू अर्जूनला कडकडून (Allu Arjun Father Hugs) मिठी मारली आहे. 

अल्लू अर्जूनचे वडील अल्लू अरविंद यांच्या डोळ्यात अश्रू आणि लेकाला मारली घट्ट मिठी (Photo: Social Media)

अल्लू अर्जूनला 'पुष्पा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पाची ही कथा 2021 च्या डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पाहता पाहत या चित्रपटानं चक्क कोट्यवधींची कमाई केली होती. त्यामुळे 'पुष्पा'ची भरारी पाहून सगळ्यांनीच तोंडात बोट घातली होती. दाक्षिणात्त्य चित्रपटांनी त्यावेळी मोठमोठ्या बॉलिवूडच्या चित्रपटांनाही टक्कर दिली होती. तेव्हा बॉलिवूडला साऊथ चित्रपट इंडस्ट्री टेकओव्हर करते आहे का? अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यावर बॉलिवूडच्या जाणकारांनीही आपली मते मांडली होती. अल्लू अर्जूनचं यावरील वक्तव्यही सर्वाधिक व्हायरल झालं होतं. आता अल्लूच्या या यशानं तो भरावून गेल्याचे दिसते आहे. फक्त साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतूनच नाही तर बॉलिवूडमधूनही अनेक मोठमोठ्या कलाकारांनी यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपली मोहोल उमटवली आहे. 

प्रिया आणि उमेशची आगळीवेगळी लव्हस्टोरी, हेही वाचा : 'उमेशनं सगळ्यांसमोर...', प्रियानं सांगितला मॉलमधला 'तो' किस्सा

चाहत्यांचे हात जोडून आभार, पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेटर्सनी केलं ट्रोल : 

Allu Arjun fans celebrated the National Awards 2023 but the haters disagreed news in marathi

यावेळी अल्लू अर्जूनच्या चाहत्यांसाठी एक आनंदसोहळा होता. अल्लूचा आता पुष्पा 2 हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानं या चित्रपटाचा फर्स्ट लुक इन्टाग्रामवर शेअर केला होता. त्याच्या या फोटोला 60 लाखांहून अधिक लाईक्स आले होते.