‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कविता

Amitabh Bachchan Marathi Poem :  अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 25, 2024, 03:27 PM IST
‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कविता  title=
(Photo Credit : Social Media)

Amitabh Bachchan Marathi Poem : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी ‘आकाशाची सावली’ ही स्वत: लिहिलेली मराठी कविता सादर करून दाखवली. ही कविता त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या मदतीनं रचली असं देखील त्यांनी सांगितलं. आता तिच कविता अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

अमिताभ यांनी या पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकर यांच्या संगीत आणि संस्कृतीतील अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकला. तर त्यावेळी लता मंगेशकर यांचा स्वर आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा धागा आहे, असं सांगितलं. त्यासोबत त्यांनी ‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’ अशी रचना असलेली ‘आकाशाची सावली’ ही मराठी कविता वाचून उपस्थितांची मने जिंकली. तिच कविता त्यांनी आता त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे. 

वाचा अमिताभ यांची ‘आकाशाची सावली’ 

काळाच्या, ज्वलन्त वाळूयर अनवाणी चालत होतो, 

पुढच्या पाउली पलीकडे पाहण्यास अक्षम... कारण काय कि ते अशक्य होते... वेळच नव्हता...

तेव्हा कर्तव्यच उद्देश होते आणि कर्तव्यच कर्म होते हेतु काय... कर्तृत्व काय... सिद्धी काय... सगळे एकच होते....

अशा प्रकारे आयुष्य जात असताना... त्या रणरणत्या उन्हात... आकाशाची एक सावली मला लाभली... त्या आकाशाचे नाव... लता मंगेशकर....

माझ्या करिता लता दीदी चे स्वर हाच संगीताचा परिचय होता.. हीच संगीताची परिभाषा होती.... हीच संगीताची व्याख्या होती....

लता दीदी म्हणजेच संगीत, आणि संगीत म्हणजेच लता दीदी... माझ्या करिता समानार्थी शब्द आहेत दोन्ही...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'धर्माच्या नावावर देशात...' मंदिर उभारणीसाठी दान न करणारी विद्या बालन असं का म्हणाली?

हा कार्यक्रम विलेपार्ले येथे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 वा पुण्यतिथी सोहळ्यात मा. दीनानाथ मंगेशकर व लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्काराविषयी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की 'इतका मोठा पुरस्कार मिळणं ही सौभाग्याची गोष्ट आहे. मी कधीच स्वत:ला या पुरस्कारसाठी योग्य मानलं नाही. हृदयनाथ मंगेशकरांनी मागच्या वर्षीसुद्धा बोलावलं होतं, पण मी तब्बेत ठीक नसल्याचं सांगितलं. खरं, तर मी चांगला होतो, पण मला यायचं नव्हते. या वर्षी माझ्याकडे कोणते कारण नसल्यानं त्यांचं आमंत्रण स्वीकारावं लागलं. लताजींनी माझ्या कुटुंबावर नेहमीच प्रेम केलं. त्यांच्याकडून आम्हाला मिळालेल्या आदराचं वर्णन शब्दांत करू शकणार नाही.'