'मी माझी बोट बुडवत त्याचा...'; निधनाआधी अभिनेत्रीनं केली धक्कादायक पोस्ट

Amrita Pandey Death News : अमृता पांडेनं निधनाची आधी शेअर केली होती धक्कादायक पोस्ट

दिक्षा पाटील | Updated: Apr 28, 2024, 02:54 PM IST
'मी माझी बोट बुडवत त्याचा...'; निधनाआधी अभिनेत्रीनं केली धक्कादायक पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Amrita Pandey Death News : 'अन्नपूर्णा' या नावानं ओळखली जाणारी भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे काल शनिवारी निधन झाले. भागलपुरच्या आदमपुर जहाज घाट स्थित असलेल्या दिव्यधर्म अपार्टमेंटमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडली. या घटनेची माहिती मिळताच जोगसर पोलिसांनी तेथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. 

प्राथमिक तपासातून या अभिनेत्रीनं गळफास घेतल्याचा अंदाज बांधला जात आहे. तिचा मृत्यू होण्याआधी तिनं व्हॉट्सॲपवर एक भावूक असं एक स्टेटस शेअर केलं होतं. ‘त्याचं आयुष्य दोन बोटींवर स्वार आहे, मी माझी बोट बुडवत त्याचा मार्ग मोकळा केला.' त्यामुळं अमृतासोबत नक्की काय घडलं याचा तपास पोलीस करत आहेत.

अमृता पांडेने अनेक हिंदी चित्रपट आणि मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तिच्या जवळच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे, अमृताची मोठी बहीण वीणा पांडे हिचं 18 एप्रिल रोजी घरी लग्न होतं. शुक्रवारी रात्री त्यांनी खूप धम्माल केली. मग अचानक काय झालं? कोणालाच कळत नाही. त्यांनी सांगितलं की, अमृताचं लग्न 2022 मध्ये छत्तीसगडच्या बिलासपूर येथील चंद्रमणी झांगडशी झालं होतं. तो मुंबईत ॲनिमेशन इंजिनीअर म्हणून काम करतो. त्यांना अद्याप मूलबाळ झालेलं नाही. अमृताच्या बहिणीनं सांगितलं की, ती तिच्या करिअरविषयी खूप चिंतेत होती. ती खूप दुःखी होती. यामुळे यावर तिचे उपचारही सुरू होते.

हेही वाचा : 'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप

अमृताच्या कुटुंबातील लोकांनी सांगितलं की भोजपुरी चित्रपटांशिवाय अमृताला वेब सीरिजमध्ये देखील काम करण्याचा अनुभव आहे. अमृतानं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकतीच अमृताची एक हॉरर वेब सीरिज ‘प्रतिशोध’ चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या वेब सीरिजविषयी ती खूप उत्सुक होती. एक दशक आधी तिनं भोजपुरी चित्रपट ‘यादव जी’ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्यासाठी तिची खूप स्तुती करण्यात आली होती. याआधी ती अनेक भोजपुर म्युजिक अल्बममध्ये दिसली होती. जोगसरमधील एका पोलिसानं सांगितलं की या सगळ्या प्रकरणावर तपास सुरु आहे. त्यामुळे या तपासातून नक्की ही गोष्ट समोर येईल ती म्हणजे तिनं आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली या विषयी माहिती मिळेल.