'या' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अलोट गर्दीने चेंगराचेंगरी, खिडक्या तोडून चाहत्याचा थिएटरमध्ये प्रवेश

अभिनेत्याची क्रेझ काय असू शकते याचे एक उदाहरण सोमवारी पाहायला मिळाले. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात बरेच लोक जखमी झाले.  

Updated: Mar 30, 2021, 09:48 AM IST
'या' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अलोट गर्दीने चेंगराचेंगरी, खिडक्या तोडून चाहत्याचा थिएटरमध्ये प्रवेश title=
थिएटरच्या बाहेर गर्दी (ANI)

मुंबई : अभिनेत्याची क्रेझ काय असू शकते याचे एक उदाहरण सोमवारी पाहायला मिळाले. तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार आणि अभिनेता आता राजकारणात प्रवेश केलेला पवन कल्याण  (Pawan Kalyan) याच्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चच्यावेळी लोकांनी अलोट गर्दी केलेली पाहायला मिळाली. विशाखापट्टणममधील संगम शरत थिएटरमध्ये पवनच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात बरेच लोक जखमी झाले. दरम्यान, कोरोनाकाळात एवढी गर्दी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आश्चर्यही व्यक्त होत आहे. (Andhra Pradesh: Ruckus erupted at a theatre in Visakhapatnam during the release of the trailer of actor Pawan Kalyan's movie)

वकील साब ट्रेलर लॉन्च (Vakeel Saab)

वास्तविक, पवन कल्याणच्या 'वकील साब' चा ट्रेलर होळीच्या दिवशी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शहरातील निवडक चित्रपटगृहात सोमवारी सायंकाळी चार वाजताची वेळ निश्चित करण्यात आली. ही माहिती मिळताच पवन कल्याणच्या चाहत्यांनी दुपारपासूनच संगम थिएटरच्या बाहेर जमण्यास सुरवात केली आणि ट्रेलरच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहिली.

चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने थिएटरच्या बाहेरचा रस्ता जाम झाला. तिथे पवन कल्याणचा फोटो ठेवून चाहत्यांनी पूजा करण्यास सुरवात केली आणि त्यांच्या फोटोसमोर नारळ फोडला गेला. यानंतर वकील साबचा ट्रेलर लॉन्च होताच तेथे चेंगराचेंगरीसारखे वातावरण निर्माण झाले. मोठ्या स्क्रीनवर आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असताना दिसत होता.

चेंगराचेंगरीनंतर अनेक चाहते कोसळलेत

पवण कल्याणची छबी पाहण्यासाठी चक्क चाहत्यांमध्ये हाणामारी सुरु झाली. चाहते यावेळी थिएटरमध्ये प्रवेश करु लागलेक. अगदी प्रेक्षकांनी थिएटरमधील खिडकीच्या काच फोडल्या आणि चाहत्यांनी आत प्रवेश करण्यास सुरुवात केली, तर काहींना छताच्यावरुन आत जायचे होते. या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. ज्यामध्ये गर्दी अनियंत्रित  झाली होती. लोक सिनेमागृहात जाताना दिसत आहे. दरम्यान, काही लोक जमिनीवरही पडले आहेत तर काहींना किरकोळ जखमीही झाली आहे.

पवन कल्याणने सुमारे दोन वर्षानंतर पुनरागमन केले आहे. या कारणास्तव निर्मात्यांनी होळीच्या विशेष निमित्ताने चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला होता. पवनचा ‘वकील साब’हा चित्रपट पिंक या बॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये अबिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसले होते. आता चाहते 9 एप्रिलची वाट पाहत आहेत, जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.