मुलासमोर 'अनिश्चयी व्यक्ती' म्हणणााऱ्या Ex-Wife मलायकाला अरबाज खानने दिलं उत्तर; म्हणाला 'तिला वाटलं म्हणून...'

मुलगा अरहानच्या (Arhaan) पॉडकास्टमध्ये आपल्याला अनिश्चयी व्यक्ती म्हणणाऱ्या मलायकाला (Malaika Arora) अरबाज खानने (Arbaaz Khan) उत्तर दिलं आहे. मलायकला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं अरबाज खान म्हणाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2024, 07:04 PM IST
मुलासमोर 'अनिश्चयी व्यक्ती' म्हणणााऱ्या Ex-Wife मलायकाला अरबाज खानने दिलं उत्तर; म्हणाला 'तिला वाटलं म्हणून...' title=

Arbaaz Khan on Maliaka Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायकाने (Malaika Arora) काही दिवसांपूर्वी आपला मुलगा अरहानच्या (Arhaan) पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी एकमेकांना अनेक बोल्ड प्रश्न विचारले होते. दरम्यान या चर्चेदरम्यान मलायकाने आपला पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानला (Arbaaz Khan) अनिश्चयी व्यक्ती म्हटलं होतं. मलायकाच्या या विधानावर अरबाज खान व्यक्त झाला आहे. मलायकाला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. मी तिने माझ्याबद्दल सांगितलेल्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याला प्राधान्य देईन असं अरबाज खान म्हणाला आहे. 

एका मनोरंजन पोर्टलशी संवाद साधताना मलायकाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अरबाज खानने सांगितलं की, "हा आई आणि मुलामधील संवाद आहे. तिने तिचं मत मांडलं आहे. तिला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. तिला काही बाबतींमध्ये मी निर्णय घेऊ शकत नसल्याचं वाटत असेल".

मलायकाने अरहानचा पॉडकास्ट ‘Dumb Biryani’ मध्ये सांगितलं होतं की, अरबाज खान प्रामाणिक आणि काही बाबतींमध्ये स्पष्टता असणारा व्यक्ती आहे. अरबाज खानने आपण मलायकाने केलेल्या सकारात्मक विधानांकडे लक्ष देत असल्याचं म्हटलं आहे. "मी मुलाखत संपूर्ण पाहिली आहे. तिने मी फार स्पष्ट असून, माझ्या विचारांमध्ये पूर्ण स्पष्टता असते असंही सांगितलं. मी त्याकडे पाहत आहे. त्या मुलाखतीत फार काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही," असं अरबाज म्हणाला आहे.

दरम्यान मुलगा आणि आईमधील हा पॉडकास्ट फारच मनोरंजक होता असं म्हटलं आहे. "तिला जे हवं ते बोलण्याचा हक्क आहे. मला त्यात काही आक्षेपार्ह वाटलं नाही. मला काही वाद घालण्याची इच्छा नाही. ते तिचं मत आहे".

पॉडकास्टमध्ये मुलगा अरहानने माझ्यात आणि वडिलांमध्ये काय साम्य आहे अशी विचारणा केली होती. त्यावर मलायकाने उत्तर दिलं होतं की, "तुझ्यात वडिलांचा एकच गुणधर्म आहे. तो म्हणजे, तो अतिशय निष्पक्ष आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. काही गोष्टींमध्ये तो मर्यादा ओलांडत नाही. तो काही गोष्टींबद्दल अगदी स्पष्ट आहे आणि ते गुण तुझ्यात आहेत". 

पण अरहान त्याच्या वडिलांसारखा अनिश्चयी आहे, जे आपल्याला आवडत नाही असंही तिने सांगितलं. "पण त्याचवेळी तू तुझ्या वडिलांसारखा फार अनिश्चयी व्यक्ती आहेस. जे मला अजिबात आवडत नाही. कोणत्या रंगाचा शर्ट घालायचा. काय खायचं, किती वाजता उठायचं याचा निर्णय तू घेऊ शकत नाहीस," असं मलायकाने म्हटलं होतं. 

मलायका अरोरा आणि अरबाज खान 19 वर्षांपासून विवाहबद्ध होते. 2017 मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. मलायका सध्या अर्जून कपूरला डेट करत आहे. दरम्यान अरबाजने 24 डिसेंबर 2023 मध्ये शौरा खानशी दुसरं लग्न केलं.