'राजकारणी पैसे खातात हे सर्वांना माहिती, हा सिस्टिमचाच भाग'; अवधुत गुप्तेचं स्फोटक विधान

Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारण आणि मतदान अशा सगळ्या गोष्टींवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 24, 2024, 03:42 PM IST
'राजकारणी पैसे खातात हे सर्वांना माहिती, हा सिस्टिमचाच भाग'; अवधुत गुप्तेचं स्फोटक विधान title=
(Photo Credit : Video Grab)

Avadhoot Gupte : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता अशी अवधूत गुप्तेची ओळख आहे. स्वत: च्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा करणारा अवधूत गुप्ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अवधूत सध्या चर्चेत येण्याचं कारण त्यानं राजकारण, मतदान आणि लोकशाही या सगळ्या गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. 

राजकारणाचं स्तर खाली गेलंय!

अवधूत गुप्तेनं ही मुलाखत 'मित्रम्हणे'ला दिली आहे. यावेळी त्याला त्याच्या जातं या गाण्याविषयी बोलताना त्यानं सांगितलं की यात समाजातील तीन प्रमुख घटक आहेत. ते तिन्ही मी यात प्ले केले आहेत. तिघांच्या बाजूनं मी बोललोय आणि तिघांच्या विरोधात मी बोललोय. यावरूनच त्याला प्रश्न विचारण्यात आला की तुला जात सारखं गाणं करावंस वाटलं कारण आजुबाजूची परिस्थिती आणि तेच तुला पडलेले प्रश्न असतील. तू आता त्याच परिस्थितीचं नेतृत्व करतात त्यांच्या मुलाखती देखील घेतोस. अशा लोकांना असे काही प्रश्न विचारलेस का? किंवा या गाण्याविषयी ते कधी काही बोललेत का? त्यावर उत्तर देत अवधूत गुप्ते म्हणाला, प्रत्येक मुलाखतीत मी या ना त्या बाजूनं मी त्यांना हे विचारत असतो, तर कधी थेट विचारतो. पण काय सांगायचं की आता मी कोणाबद्दल विशिष्ट असं बोलत नाही, पण हे राजकारणी स्वत: म्हणतात की राजकारणाचं स्तर खाली गेलाय. तो खाली गेलाय म्हणजे काय? की ज्या गोष्टींची राजकारण्यांना किंवा पूर्वीच्या समाजातील लोकांना ज्या गोष्टीची लाज वाटायची किंवा ज्या गोष्टीचा स्विकार करत नव्हते. त्याला आता जवळपास सगळेच लोक स्विकार करतात."  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...' मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?

राजकारणी पैसे खातात?

पुढे याविषयी सविस्तर सांगत अवधूत म्हणाला, "आता मंत्री झाले म्हटल्यानंतर ते पैसे तर थोडे खाणार 10 टक्के तर घेणार ते कामाचे, ते घ्या पण बाकी 90 टक्क्याचं काम करा आणि आमच्याकडे पहिले करा, हे सामान्य माणूस बोलायला लागला आहे. एखादा नेता आहे किंवा मंत्री आहे. त्यांनी पैसे खाल्ले किंवा तो खातो ही गोष्ट सामान्यतल्या सामान्यला मान्य झाली आहे, ही खरोखर मान्य झाली आहे, सिस्टमचा भाग झाला आहे. हे जातीचं राजकारण असू दे किंवा सर्वच... या सगळ्याला ते लोक जबाबदार नाही त्याला आपण सामान्य माणसं जबाबदार आहोत. प्रत्येकाला लायकीचं सरकार मिळतं ते वाक्य आहे ना, ते खरंय ना. लोकं या राजकारण्यांना शिव्या देतात की तुम्ही जातीचं राजकारण केलं, पण त्यासाठी ते किती दोषी आहेत. ते 5 टक्के दोषी आहेत, 95 टक्के आपण दोषी आहोत. त्यांना वोट बॅंक हा शब्द कोणी दिला. अजूनही त्यांना अमूक जातीची वोट बॅंक तमूक जातीची वोट बॅंक, या समाजाची ही वोट बॅंक, हे कोणी केलं? आपण केलं ना. 75 वर्षांनंतरही या वोट बॅंक आजही देशात अस्तित्वात करतात. ही त्यांची चूक आहे की आपली. ही सामान्य माणसाची चूक आहे."