'पराभव स्वीकारून बाबाकडे जाऊ...', बाबिल खाननं वडिलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त करताच चाहते चिंतेत

Babil Khan : दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याची ही भावूक पोस्ट पाहून चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 25, 2024, 12:42 PM IST
'पराभव स्वीकारून बाबाकडे जाऊ...', बाबिल खाननं वडिलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त करताच चाहते चिंतेत title=
(Photo Credit : Social Media)

Babil Khan : बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान त्याच्या वडिलांप्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. चित्रपटसृष्टीत त्यानं अभिनयाच्या जोरावर त्यानं सगळ्यांची मने जिंकली. तो नेहमीच इरफान खानचा आठवणी सोशल मीडियावर शेअर करतान दिसतो. पण सध्या सोशल मीडियावर त्यानं अशी काही पोस्ट शेअर केली की सगळ्यांना त्यानं चिंतेत टाकलं. या पोस्टमध्ये तो म्हणाला की कधी वाटतं की पराभव स्वीकारून बाबांकडे जाऊ.

बाबिल खाननं काल इन्स्टाग्रामवर अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली. यावेळी त्यानं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की कधी वाटतं पराभव स्वीकारून बाबांकडे निघून जाऊ. बाबिलनं काही वेळात ही पोस्ट डिलीट केली. पण त्याच्या काही चाहत्यांनी या पोस्टचा स्क्रिनशॉट काढला होता. त्यांना बाबिलची चिंता वाटू लागली होती. त्यांना प्रश्न पडला की नक्की त्यांच्यासोबत असं काय झालं की त्यानं अशी पोस्ट शेअर केली. 

babil khan shared an emotional post on his father irrfan khan went viral

काही दिवसांपूर्वी बाबिलनं इरफान खान आणि आई सुतापा सिकंदरचा एक जूना फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती. या ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटोमध्ये इरफान खान त्याच्या पत्नीकडे पाहताना दिसतो? हा फोटो शेअर करत बाबिलनं कॅप्शन दिलं होतं की 'मी तुम्हाला मिस करणार, हे तुम्हाला माहित आहे का? माझ्या छत्रीच्या खाली उभा आहे. मी तुम्हाला मिस करणार, पण मला वाटतं की आता पावसात डान्स करण्याची वेळ आली आहे.'

इरफान खान यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 'सलाम बॉम्बे!', 'लाइन इन ए... मेट्रो', 'द लंचबॉक्स' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडशिवाय हॉलिवूडमध्ये देखील त्यानं काम केलं आहे. इरफानचं निधन कॅन्सरनं झालं. एप्रिल 2020 ला त्यानं अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या मनात आता फक्त इरफानच्या आठवणी राहिल्या आहेत. 

हेही वाचा : शेखर सुमनच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा… जगण्या-मरण्याचा संघर्ष, चमत्कारचा उल्लेख करताना भावूक झाला अभिनेता

दुसरीकडे बाबिलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'कला' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याच्यासोबत तृप्ती डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली. त्याशिवाय तो के के मेनन, आर. माधवन, दिव्येंदु आणि काही कलाकारांसोबत ‘द रेल्वे मॅन’ मध्ये दिसली होती. तर लवकरच तो शूजीत सरकारच्या ‘द उमेश क्रॉनिकल्स’ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.