'माधुरीच्या लग्नानंतर माझ्या वडिलांनी स्वत: ला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं'; दीपिका पदुकोणचा खुलासा

Deepika Padukone's Father had crush on Madhuri Dixit : दीपिका पदुकोणनं एका मुलाखतीत माधुरीसमोर हा किस्सा सांगितला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 5, 2024, 12:42 PM IST
'माधुरीच्या लग्नानंतर माझ्या वडिलांनी स्वत: ला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं'; दीपिका पदुकोणचा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Deepika Padukone's Father had crush on Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या दीपिका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. दीपिका चर्चेत येण्याचं कारण तिचे वडील प्रकाश पदुकोण ठरले आहेत. प्रकाश पदुकोण यांना माधुरी दीक्षितवर क्रश होतं. याविषयी दीपिकानं चक्क माधुरीसमोरचं सांगितलं होतं. दीपिका आणि माधुरी हे दोघं एका कार्यक्रमात होते. त्यावेळी दीपिका म्हणाली की माधुरीच्या लग्नाची बातमी कळताच तिच्या वडिलांनी जे काही केलं त्यावरुन सगळ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. 

दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे लोकप्रिय बॅडमिंटन खेळाडू होते. दीपिकाच्या वडिलांनी माधुरीच्या लग्नाविषयी कळलं तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि त्यांनी नक्की काय केलं, याचा खुलासा दीपिकानं 2016 मध्ये दिलेल्या 'इंडिया टुडे' च्या मुलाखतीत सांगितलं. दीपिका म्हणाली, जेव्हा त्यांना माधुरीच्या लग्नाविषयी कळलं, तेव्हा ती इतके डिस्टर्ब झाले की त्यांनी संपूर्ण दिवस स्वत: ला वॉशरुममध्ये लॉक करुन घेतले. त्यात जेव्हा दीपिकानं सांगितलेलं माधुरीनं ऐकलं तेव्हा माधुरीला आश्चर्य झालं आणि ती हळूच हसली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दीपिकानं पुढे हा देखील खुलासा केला की या घटनेनंतर तिच्या वडिलांची घरातील सगळे थट्टा करु लागले होते. त्याशिवाय हे देखील सांगितलं की त्यांना किती वाईट वाटलं होतं हे त्यांच्या डोळ्याच्या अवती-भोवती असलेल्या डार्क सर्कलवरून कळलं होतं. इतकंच नाही तर दीपिकाची आई त्यांना सतत विचारत होती की ते बाथरुममध्ये रडत तर नाही आहेत. 

माधुरीच्या चाहत्यांची यादी ही फार मोठी आहे. त्यात अनेक सेलिब्रिटींची नावं आहे. त्यात रणबीर कपूरचं देखील नाव आहे. त्यानं 'ये जवानी है दीवानी' चित्रपटा दरम्यान, खुलासा केला होता की माधुरी त्याची क्रश असून तिच्यासोबत डान्स करण्याचं स्वप्न हे 'घाघरा' गाण्यामुळे पूर्ण झाले. त्याशिवाय या यादीत शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ आणि विकी कौशल या कलाकारांना देखील माधुरीवर क्रश होतं. 

हेही वाचा : 'नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान', कंगना रणौतच्या दाव्यावर प्रकाश राज म्हणतात...

दीपिका विषयी बोलायचे झाले तर सध्या ती तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. दीपिकानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेग्नंट असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती.