प्रियांका चोप्राच्या कुटुंबाने पुण्यातील बंगला दिला भाड्याने

 पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेला एक बंगला सह-रहिवासी आणि सहकारी संस्था, द अर्बन नोमॅड्स कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाड्याने दिल्याचं वृत्त आहे

Updated: Apr 25, 2024, 08:12 PM IST
प्रियांका चोप्राच्या कुटुंबाने पुण्यातील बंगला दिला भाड्याने title=

मुंबई : प्रियांका चोप्राचा भाऊ, सिद्धार्थ चोप्रा आणि तिची आई, मधु चोप्रा यांनी पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेला एक बंगला सह-रहिवासी आणि सहकारी संस्था, द अर्बन नोमॅड्स कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाड्याने दिल्याचं वृत्त आहे, हिंदुस्तान टाईम्सनुसार. .पुढे, अहवालात असे म्हटलं आहे की, Zapkey द्वारे प्रवेश केलेल्या कागदपत्रांनुसार या बंगल्याचं भाडं दरमहा ₹2 लाख आहे.

सिद्धार्थ आणि मधु यांनी 21 मार्च रोजी नोंदणीकृत अर्बन नोमॅड्स कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेडसोबत एग्रीमेंट केलं आहे.  कागदपत्रांच्या आधारे, फर्मने ₹6 लाख इतकं डिपॉजिट ठेवलं आहे. आणि मासिक भाडं ₹2.06 लाख भरणार आहे. पुढे, एग्रीमेंटमध्ये असंही नमूद केलं आहे की, पुण्यातील बंगला 3754 चौरस फूट आहे. तर ग्राऊंड फ्लोअर 2180 चौरस फूट आहे,  तर बेसमेंट 950 चौरस फूट आहे आणि तर आजूबाजूचा परिसर 2232 चौरस फूट आहे. कागदपत्रांनुसार, बंगल्यात 400 चौरस फूट पार्किंग क्षेत्र देखील समाविष्ट आहे.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, प्रियांका शेवटची सॅम ह्यूघन आणि सेलीन डीओनसोबत लव्ह अगेनमध्ये दिसली होती. बाजीराव मस्तानी फेम अभिनेत्रीकडे जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत ॲक्शन फिल्म हेड्स ऑफ स्टेट देखील आहे.अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने ओशिवरा येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये 6 कोटी रुपयांना 2,292 चौरस फुटांचं बिल्ट-अप क्षेत्रफळ असलेले दोन पेंटहाऊस विकले होते. ओशिवरा, अंधेरी, मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये हे दोन पेंटहाऊस आहेत.

कागदपत्रांनुसार, वरच्या मजल्यावर असलेलं पहिलं पेंटहाऊस, सुमारे 860 स्क्वेअर फूट, ₹ 2.25 कोटींना विकलं गेलं, तर दुसरं पेंटहाऊस, 1,432 स्क्वेअर फूट, ₹ 3.75 कोटींना विकलं गेलं. खरेदीदाराने दोन्ही व्यवहारांसाठी सुमारे ₹36 लाख  शुल्क भरले. दोन पेंटहाऊसची नोंदणी अनुक्रमे 23 आणि 25 ऑक्टोबर रोजी झाली होती.