मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!

Raj Kundra and Shilpa Shetty's properties seized by ED :  शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचं वैभव संकटात, ईडीनं 98 कोटींची संपत्ती केली जप्त

दिक्षा पाटील | Updated: Apr 18, 2024, 01:20 PM IST
मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त! title=
(Photo Credit : Social Media)

Raj Kundra and Shilpa Shetty's properties seized by ED : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरोधात ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेनं गुरुवारी म्हणजे आज 18 एप्रिल रोजी राज कुंद्राची 97 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीनं ज्या मालमत्तेला अटॅच केलं आहे. त्यात शिल्पा शेट्टीता जुहूत असलेल्या बंगला देखील आहे. तिचा पती राज कुंद्रा याच्यावर ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्या दोघांची मिळून एकूण 97.79 कोटींची संपत्ती ईडीनं यावेळी अटॅच केली आहे. 

ईडीनं बिटकॉइन पॉन्जी स्कॅम अंतर्गत राज कुंद्राविरोधात ही अॅक्शन घेतली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत पुण्यातील एक बंगला आणि इक्विटी शेयर देखील आहेत. दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की ईडीनं मराहाष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांकडून वन वेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाजसोबत इतर लोकांना विरोधात तक्रार दाखल केली असून या संबंधीत तपास सुरु केला होता. या सगळ्यांवर हा आरोप आहे की त्यांनी बिटकॉइन्सच्या रुपात लोकांकडून खूप मोठी रक्कम मिळवली आणि बिटकॉइनच्या रुपात दर महिन्याला 10 टक्के परत करण्याचं वचन दिलं होतं.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीच्या चौकशीत हा खुलासा झाला की राज कुंद्राला यूक्रेनमध्ये मायनिंग फार्म उभं करण्यासाठी गेन बिटकॉइनचे प्रमोटर आणि मास्टरमांइंड अमित भारद्वाजकडून 285 बिटकॉइन घेतले होते. तर या सगळ्या प्रकरणात राज कुंद्रानं हेराफेरी केली होती. 

दरम्यान, याआधी 2018 मध्ये राज कुंद्राची 2000 कोटींच्या बिटकॉइन घोटाळ्या प्रकरणी चौकशी केली होती. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ठाणे क्राइम ब्रान्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीसाठी राज कुंद्राची चौकशी करण्यात आली होती. तेव्हा अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की हे स्पष्ट नाही की राज कुंद्रानं हा घोटाळा केला आहे किंवा तो पीडित आहे. पण आता जो काही प्रकार घडत आहे त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : रवी किशन यांची 'दुसरी पत्नी' अन् 20 कोटी रुपये; थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलेलं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिल्पा शेट्टी ही आधी इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्सची सह-मालक होती. 2021 मध्ये समोर आलेल्या पॉनोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं नाव समोर आलं होतं. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीनही मिळाला होता.