पॉवरहाऊस परफॉर्मर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकुमार रावने पटकावला 'टॅलेंट ऑफ द इअर'

भूमी पेडणेकर सह-अभिनेता अनुभव सिन्हा यांच्या भिडमधील त्याच्या दमदार आणि प्रभावी अभिनयामुळे राजकुमार चर्चेत आहे. राजकुमार रावने अलीकडेच जिओ स्टुडिओ इव्हेंटमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित Stree 2 ची रिलीजची तारीख देखील त्यांच्या टीमनेसहित मोठ्या दिमाखात जाहीर केली. 

Updated: Apr 17, 2023, 03:37 PM IST
पॉवरहाऊस परफॉर्मर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकुमार रावने पटकावला 'टॅलेंट ऑफ द इअर' title=

मुंबई : राजकुमार राव  त्याच्या अभूतपूर्व कामामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.  राजकुमार रावने सोशल मीडियावर 'स्त्री'च्या सिक्वेलची घोषणा केली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे काही संवाद ऐकायला मिळत आहेत.  यासोबतच तिने माहिती दिली की, चित्रपटाचा दुसरा भाग पुढील वर्षी म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये येणार आहे. 

ज्यामुळे त्याला प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. " व्हर्सेटाइल टॅलेंट ऑफ द इयर" हा किताब त्याने पटकावला आगे. राजकुमारने अलीकडेच एका प्रतिष्ठित अवॉर्ड शोमध्ये बॉलीवूड हंगामा अवॉर्ड्समध्ये 'मोस्ट स्टायलिश यूथ आयकॉन' आणि त्यानंतर 'सर्वोत्कृष्ट अभिनेता- ज्युरी' हा किताब पटकावला. 2023 साठी, राजकुमार रावकडे मिस्टर आणि मिसेस माही, गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक देखील आहे. ज्याचा टीझर नुकताच रिलीज झालाय. 

भूमी पेडणेकर सह-अभिनेता अनुभव सिन्हा यांच्या भिडमधील त्याच्या दमदार आणि प्रभावी अभिनयामुळे राजकुमार चर्चेत आहे. राजकुमार रावने अलीकडेच जिओ स्टुडिओ इव्हेंटमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित Stree 2 ची रिलीजची तारीख देखील त्यांच्या टीमनेसहित मोठ्या दिमाखात जाहीर केली. सर्वच प्रोजेक्टमध्ये रावची वेगळी भूमिका पाहायला मिळणार असून सर्वत्र राजकुमारची चर्चा आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना पुन्हा एकदा चित्रपटाच्या भाग २ मध्ये दिसणार आहेत.  लोकांचं प्रेम आणि चित्रपटाला मिळालेले यश पाहून निर्मात्यांनी त्याचा सिक्वल जाहीर केला आहे. 'स्त्री' पुन्हा एकदा चित्रपटगृहात परतणार असल्याचं वृत्त आहे. या चित्रपटाचा सिक्वेल कधी येणार, त्याची रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

2018 साली आलेल्या राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री' सिनेमाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भरपूर प्रतिसाद मिळाला होता. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

खरं तर, अलीकडेच जिओ स्टुडिओने 100 चित्रपट आणि वेब सिरीज जाहीर केल्या आहेत. या प्रकल्पांच्या यादीत शाहरुख खानचा 'डांकी' आणि रणदीप हुडाचा 'इन्स्पेक्टर अविनाश' यांचा समावेश आहे.   'स्त्री 2' आणि 'भेडिया 2' देखील दिनेश विजनच्या मॅडॉक प्रॉडक्शनमध्ये सामील झाले आहेत. 'स्त्री'च्या सिक्वेलची अनेक दिवसांपासून चर्चा होती, ज्याची रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.