एआर रहमानला 'ज्या' गाण्यासाठी ऑस्कर मिळाला ते गाणं त्याचं नव्हतंच! रामगोपाल वर्माचा दावा

Ramgopal Says Jai Ho Song was not AR Rahman's : रामगोपाल वर्मानं एका मुलाखतीत एआर रहमानच्या 'स्लमडॉग मिलियनेयर' चित्रपटातील 'जय हो' गाण्याविषयी एक मोठा दावा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 20, 2024, 02:48 PM IST
एआर रहमानला 'ज्या' गाण्यासाठी ऑस्कर मिळाला ते गाणं त्याचं नव्हतंच! रामगोपाल वर्माचा दावा  title=
(Photo Credit : Social Media)

Ramgopal Says Jai Ho Song was not AR Rahman's : 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्लमडॉग मिलियनेयर' हा चित्रपट आणि त्यातील 'जय हो' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. चित्रपटातील या गाण्यानं गोल्डन ग्लोब, ग्रॅमी आणि बाफ्टा सारखे अनेक पुरस्कार मिळवले. हे गाणं आजही अनेकदा काही मोठा कार्यक्रम असेल तर आपल्याला ऐकायला मिळतो. अशात हे गाणं एआर रहमाननं कम्पोज केल नसून गायक सुखविंदर सिंहनं केल्याचा दावा दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं केला आहे. त्यांनी या गाण्या संबंधीत अनेक किस्से शेअर केले आहेत. रामगोपाल वर्मानं हे देखील सांगितलं की एआर रहमान आणि सुभाष घई यांच्यात झालेल्या वादाचं कारण काय होतं. 

खरंतर, युवराजच्या शूटिंग दरम्यान, सुभाष घई आणि एआर रहमान यांच्यात भांडण का झालं याचा खुलासा रामगोपाल वर्मानं 'फिल्म कंपॅनियन' ला दिला. एआर रहमान 'युवराज' या चित्रपटासाठी म्युजिक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष घई करत होते. रामगोपालनं सांगितलं की सुभाष घई यांनी एआर रहमानला सांगितलं की एका गाण्यासाठी म्यूजिक कंपोज कर. पण एआर रहमाननं त्याच्या बिझी शेड्यूलमुळं असं होऊ शकलं नाही. गाणं कंपोज करण्यासाठी उशिर झाल्यानं सुभाष घई संतापले. तेव्हा रागात असलेल्या सुभाष घई यांनी एआर रहमाला खूप सुनावलं. एआर रहामननं सांगितलं की तो लंडनवरून परत आला की त्याला सुखविंदर सिंहच्या स्टूडियोमध्ये भेटा. एआर रहमान जेव्हा लंडनमध्ये होता तेव्हा त्यानं सुखविंदर सिंगला ट्यून बनवण्यास सांगितलं. सुखविंदरनं असंच केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेव्हा सुभाष घई हे दिलेल्या वेळी सुखविंदर सिंगच्या स्टुडियोमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी ते पाहिलं तेव्हा पाहिलं की एआर रहमानच्या जागी म्यूजिक तयार केला. सुभाष घईनं विचारलं तर सुखविंदरनं सांगितलं की एआर रहमाननं त्याला एका गाण्यासाठी म्यूजिक बनवण्यासाठी सांगितलं होतं. त्यावेळी एआर रहमान देखील तिथे पोहोचला आणि त्यांनी सुकविंदरला विचारलं की म्यूजिक तयार आहे का? त्यानंतर सुभाष घई यांना म्यूजिक ऐकवलं आणि त्यावर त्यांचं मत काय हे विचारलं? 

रामगोपाल वर्माच्या म्हणण्यानुसार, "सुभाष घई संतापले आणि एआर रहमानला म्हणाले की मी तुला कोटींमध्ये मानधन देतो आणि म्यूजिक डायरेक्टर बनवलंय आणि तू म्यूजिक सुखविंदरकडून बनवूण घेतोय? माझ्यासमोर तुझं हे बोलण्याची इच्छा कशी झाली? जर मला सुखविंदर हवा असेल तर मी त्याला साइन करेन ना. पण मग तू कोण आहेस जो माझे पैसे घेऊन सुखविंदरकडून माझ्या चित्रपटाची ट्यून कंपोज करून घेतो." 

हेही वाचा : 'ओंकार भोजनेलापण साडी नेसायला लावली...', प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी केलं निलेश साबळेला ट्रोल

रामगोपाल वर्माच्या म्हणण्यानुसार, "यावर एआर रहमाननं सुभाष घई यांना उत्तर दिलं की तुम्ही माझ्या नावाचे पैसे देत आहात, माझ्या म्यूजिकचे नाही. जर मी या गाण्यांना एंडोर्स करत आहे, तर हे माझं गाणं आहे याचा अर्थ हे एआर रहमान म्यूजिक आहे. तुम्हाला काय माहित आहे का की 'ताल' चं म्यूजिक मी कसं बनवलं? काय माहित ते माझ्या ड्रायव्हर किंवा कोणी दुसऱ्यानं बनवलंय?" 

या वादानंतर सुभाष घई यांनी ते गाणं 'युवराज' मध्ये घेतलंच नाही आणि एआर रहमानसोबत भांडण झालं. त्यानंतर एआर रहमाननं ते गाणं 'स्लमडॉग मिलियनेयर' मध्ये वापरलं आणि ऑस्कर अवॉर्ड जिंकला. युवराज चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर 2008 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो फ्लॉप ठरला. पण चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली. सलमान खान आणि झरीन खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते.