काँग्रेसच्या सदस्यांना काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचा सवाल; पाहा Video

Swatantrya Veer Savarkar Movie Trailer Video : अभिनेता रणदीप हुड्डा याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात साकारलाय भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक वेगळा पैलू. ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल...   

सायली पाटील | Updated: Mar 5, 2024, 12:25 PM IST
काँग्रेसच्या सदस्यांना काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचा सवाल; पाहा Video  title=
Randeep Hooda shines in Swatantrya Veer Savarkar bollywood movie trailer watch full video

Swatantrya Veer Savarkar Movie Trailer Video : भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये योगदान देणाऱ्या अनेकांचीच नावं आपण शालेय जीवनापासून वाचत आलो. विविध संदर्भांमुळं ही नावं, ही माणसं आणि त्यांचं कार्य आपल्यासमोर येत राहिलं. अशा या स्वातंत्र्यलढ्यातील काही नावं मात्र काळाच्या ओघात हरवली. पण, त्यांचं योगदान मात्र विसरणं निव्वळ अशक्य. अशा या स्वातंत्र्यसैनिकांमधील एक मोठं नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. 

काळ्या पाण्याची शिक्षा, स्वातंत्र्य लढ्य़ासाठीचं त्यांचं योगदान आणि इंग्रजांविरुद्ध सढा देताना त्यांनी घेतलेली अखंड भारताची प्रतिज्ञा हे सर्वकाही जीवनातील विविध टप्प्यांवर शिकण्याची संधी आतापर्यंत अनेकांना मिळाली. आता याच सर्व संदर्भाचं दृश्यरुप पाहण्याची संधीही मिळणार आहे. निमित्त आहे ते म्हणजे, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) चित्रपट आणि त्याचा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ट्रेलर. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

महात्मा गांधी, लोकमान्य टीळक, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह तत्कालीन नेतेमंडळी आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये योगदान देणाऱ्या अनेक व्यत्तीरेखा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. त्याशिवाय विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाशी संबंधित काही रहस्यही या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रकाशझोतात येणार आहेत. एकिकडून स्वातंत्र्यासाठी निवडण्यात आलेला अहिंसेचा मार्ग आणि दुसरीकडून सशस्त्र क्रांतीसाठी देण्यात आलेली हाक असा विचारांमधील मतभेदही चित्रपटात हाताळण्यात आल्याचं ट्रेलर पाहता लक्षात येतं. 

हेसुद्धा वाचा : HDFC, Axis आणि ICICI नं बदले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का? 

 

अभिनेत्री अंकिता लोखंडे या चित्रपटातून रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असून, 22 मार्च 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना रणदीप लिहितो, 'ब्रिटीशांनी त्यांना सर्वात घातक व्यक्ती म्हटलेलं! भारतीय क्रांतीकारकांनी त्यांना वीर म्हटलं. पण, तरीही त्यांना अपेक्षित आदर मिळाला नाही, त्यांचा अपेक्षित उल्लेख झालाच नाही. आता 22 मार्च रोजी इतिहास पुन्हा नव्यानं लिहिला जाणार. तुम्हीही सज्ज व्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट पाहण्यासाठी, भारतीय सशस्त्र क्रांतीची गाथा ऐकण्यासाठी...'