रवी किशन यांची 'दुसरी पत्नी' अन् 20 कोटी रुपये; थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलेलं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Ravi Kishan Wife Preeti Shukla Filef case against Aparna Thakur : रवी किशन यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिले विरोधात अभिनेत्याच्या पत्नीनं केली तक्रार! जाणून घ्या नेमकं प्रकरण

दिक्षा पाटील | Updated: Apr 18, 2024, 12:11 PM IST
रवी किशन यांची 'दुसरी पत्नी' अन् 20 कोटी रुपये; थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलेलं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? title=
(Photo Credit : Social Media)

Ravi Kishan Wife Preeti Shukla Filef case against Aparna Thakur : लोकप्रिय अभिनेता रवी किशन यांच्या संबंधीत एक बातमी समोर आली आहे. त्यांच्या विरोधात एका अपर्णा ठाकुर नावाच्या महिलेनं लखनऊमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दावा केला की रवी किशन त्यांच्या दुसऱ्या लग्नानंतर झालेल्या मुलीला सामाजिक आणि सार्वजनिकरित्या स्विकारत नाही आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की रवी किशन यांची पत्नी प्रीति शुक्लानं अपर्णा ठाकूर विरोधात हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या तक्रारित म्हटलं आहे की अपर्णानं त्यांना धमकी दिली आणि 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 

अपर्णा ठाकरुचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि तिनं रवी किशन यांच्यावर खोट्या बलात्काराचे आरोप करत त्यांना फसवण्याचे आणि पैसे दिले नाही तर कुटुंबाला जिवेमारण्याची धमकी दिली आहे. तिच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही त्यानंतर तिनं लखनऊमध्ये प्रेस कॉन्फरन्स करत रवी किशन यांच्यावर खोटे आरोप केले. यात हे देखील सांगण्यात आलं आहे की अपर्णा ठाकुरच्या लग्नाला 35 वर्ष झाले आहेत आणि तिच्या नवऱ्याचे नाव राजेश सोनी आहे. तर त्यांची एक मुलगी ही 27 वर्षांची आहे तर एक मुलगा 25 वर्षांचा आहे. या सगळ्या एफआयआरची एक कॉपी देखील व्हायरल होत आहे. 

अपर्णा ठाकूरनं काय केले होते आरोप?

अपर्णा ठाकूरनं घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की माझं नाव अपर्णा आहे आणि माझी मुलगी खासदार आणि अभिनेता रवी किशन यांची मुलगी आहे. ज्याला ते मान्य करत नाही आहेत. अपर्णानं या प्रकरणात कारवाई करण्याविषयी देखील म्हटलं आहे की 'या प्रकरणात मी कोर्टात देखील जाऊ शकते.' 

हेही वाचा : सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आणखी एका संयशिताला अटक! 10 गोळ्या झाडण्याची होती ऑर्डर...

तर दुसरीकडे अपर्णा ठाकुरची मुलगी शिनोवानं व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांकडे एक आवाहान केलं असून त्यात ती म्हणाली की तिला तिची खरी ओळख आणि अधिकार मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. अपर्णा ठाकुरनं म्हटलं की तिला रवी किशन यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी तिला पोलिसांची या प्रकरणात इन्व्हॉलमेंट टाळायची होती आणि त्यांना काही त्रास होऊ द्यायचा नाही. रवी किशन यांच्यासोबतच्या तिच्या लग्नाबद्दल माहिती देताना, तिने आरोप केला की त्यांनी 1996 मध्ये मालाड, मुंबई येथे लग्न केलं होतं आणि तिनं एकतर तिची मुलगी औपचारिकपणे दत्तक घ्यावं आणि तिला स्वतःचं मूल म्हणून वाढवावं अशी तिची इच्छा होती.