सई ताम्हणकरचं 2024 हे वर्ष बॉलिवूडसाठीच! एक- दोन नाही तर तीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार...

Sai Tamhankar's Bollywood Projects : सई ताम्हणकरचं नशिब फळफळलं! एकाच वर्षी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार

दिक्षा पाटील | Updated: Mar 28, 2024, 11:01 AM IST
सई ताम्हणकरचं 2024 हे वर्ष बॉलिवूडसाठीच! एक- दोन नाही तर तीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार... title=
(Photo Credit : Social Media)

Sai Tamhankar's Bollywood Projects : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचं 2024 वर्ष हे बॉलिवूडसाठीच आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण एक नाही तर सलग सईकडे सलग तीन प्रोजेक्ट्स आहेत. सई लवकर 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये दिसणार आहे. या प्रोजेक्ट्समध्ये सई ही इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या दोन्ही आगामी प्रोजेक्टच्या घोषणा ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या स्लेटमधून करण्यात आली असून सई या दोन्ही प्रोजेक्ट्सचा भाग बनली आहे. या दोन्ही आगामी प्रोजेक्ट बद्दल आता प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. 

इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी सारख्या दोन दमदार कलाकारांचा सोबतीने सई दिसणार असून तिच्या साठी हा क्षण खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट मधल्या खास सह-कलाकारांबद्दल सई म्हणाली "इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी या दोघांची स्तुती करावी तेवढीच कमी आहे. दोघांच्या सोबतीनं काम करण्याचा अनुभव खूप शिकवून जाणारा होता. इमरान आणि प्रतीक हे अप्रतिम अभिनेते आहेत. आम्ही सोबत काम करतोय आणि आता हे काम कधी एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. माझ्यासाठी ही एक स्वप्नपूर्ती आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण बॉलिवूडमधल्या या दोन कलाकारांच्या सोबतीनं काम करण याहून मोठं काय असणार".

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई 'डब्बा कार्टेल'मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर 'डब्बा कार्टेल' प्रदर्शित होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका, शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. 2024 मध्ये सईच्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी आहे आणि हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय.

हेही वाचा : अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आले समोरासमोर; इतक्यात चिमुकला म्हणाला....

सई ताम्हणकर नुकतीच ‘भक्षक’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका होती तर सई ताम्हणकरची महत्त्वपूर्ण भूमिका होती.