सलमाननं संपवला संजय लीला भन्साळीसोबतचा वाद! ‘हीरामंडी’ च्या प्रीमियरला दिसला भाईजान

Salman Khan Heeramandi :  सलमान खान पोहोचला  ‘हीरामंडी’च्या प्रीमियरला... चाहत्यांमध्ये एकच चर्चा 

दिक्षा पाटील | Updated: Apr 25, 2024, 07:33 PM IST
सलमाननं संपवला संजय लीला भन्साळीसोबतचा वाद! ‘हीरामंडी’ च्या प्रीमियरला दिसला भाईजान title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Heeramandi : बॉलिवूडचा किंग खान सलमान खाननं त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सलमान खाननं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यासोबत इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खानची दिग्दर्शकांसोबत चांगली मैत्री देखील झाली होती. त्यात सलमान खाननं संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करुन दोन चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर त्यांनी एकत्र काम केलं नाही. यात संजय लीला भन्साळी हे त्यांची आगामी सीरिज 'हीरामंडी: द डायमंड बाजार' मुळे चर्चेत आहेत. नुकताच या सीरिजचा प्रिमियर झाला. त्यावेळी सगळ्यांचं लक्ष हे सलमान खाननं वेधलं. 

काल संध्याकाली ‘हीरामंडी’ च्या स्पेशल स्क्रीनिंग होस्ट देखील केला आहे. यावेळी अनेक बड्या कलाकारांनी इथे हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. पण एका फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले. संजय लीला भन्साळीसोबत यावेळी सलमान खान दिसला आहे. खरंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान बऱ्याच काळानंतर एकत्र दिसत आहेत. कारण काही काळापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा काम करण्याचा विचार केला होता. पण त्यांच्यात काही वाद झाला आणि त्यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो कोणता चित्रपट तर तो इंशाअल्लाह होता. त्यांनी त्या चित्रपटाची घोषणा देखील केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमानसोबत 'इंशाअल्लाह' या चित्रपटात आलिया भट्टला कास्ट करण्यात आलं होतं. पण काही दिवसांनंतर माहिती समोर आली होती की आता हा चित्रपट होणार नाही. त्याचं कारण संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्यात चित्रपटाच्या पटकथेवरून झालेला वाद होता. त्यांची मतं एकमेकांना आवडत नव्हती. ज्यामुळे चित्रपट तयार होण्याच्या आधीच बंद झाला. तर त्या दोघांना आता एकत्र पाहून नेटकऱ्यांनी त्या दोघांच्या चर्चेत असलेल्या 'इंशाअल्लाह' या चित्रपटाला घेऊश 'इंशाअल्लाह' अशी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : ‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कविता

दरम्यान, 'हीरामंडी' या सीरिजच्या स्क्रीनिंग दरम्यान, सलमान खाननं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची फंकी पॅन्ट परिधान केली होती. त्यासोबत आलिया भट्ट देखील इथे दिसली होती. तिनं पांढऱ्या रंगाचा शरारा ड्रेस परिधान केला होता. तर ही सीरिद 1 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.