VIDEO : सलूनवर स्वत: चा फोटो पाहून संतोष जुवेकरला आठवलं बालपण

Santosh Juvekar : संतोष जुवेकरनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 28, 2024, 06:48 PM IST
VIDEO : सलूनवर स्वत: चा फोटो पाहून संतोष जुवेकरला आठवलं बालपण title=
(Photo Credit : Social Media)

Santosh Juvekar : मराठमोळा अभिनेका संतोष जुवेकर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. संतोष हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी विकी कौशलसोबतच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला होता. आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्यानं नुकताच शेअर केलेला व्हिडीओ. संतोषनं एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात त्यानं एक सलूनचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

संतोष जुवेकरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा फोटो एका सलूचा आहे. या सलूनवर लावण्यात आलेल्या होर्डिंगवर संतोष जुवेकरचा फोटो आहे. हा शेअर करत संतोष जुवेकरनं कॅप्शन दिलं की "लहानपणी बाबा सलून मधे केस कापायला घेऊन जायचे तेंव्हा केसकपणारे उत्तम काका मला त्यांच्या दुकानातल्या भिंतीवर लावलेल्या अनेक हिरोंचे फोटो दाखवून विचारायचे, बाळा बोल कुणासारखे कापू केस तुझे.... अमिताभ बच्चन सारखे की मिथुन सारखे की अनिल कपूर सारखे की शारुख खान सारखे की सलमान खान सारखे............. आणि मग त्यातला मी एक फोटो निवडायचो आणि सांगायचो. पण ते कापायचे तसेच जसे बाबा त्यांना सांगायचे (दोघ मिळून हया लहान जीवाला चु....... बनवायचे ) असो ते महत्त्वाचं नाही तर सांगायचं कारण हे की काल शूटला जाताना अचानक मला रस्त्यात एक केश करतनालाय (सलून, हेअर ड्रेसर) दुकान दिसलं आणि त्याच्या नावाच्या बोर्ड वर चायला चक्क माझा फोटो लावला होता त्या भावान.. आता बहुतेक पोर दुकानात जाताना बाहेरच ठरवत असतील कुणासारखे केस कापायचे ते.. ये बाप्पू...... साल्ला अपून तो हिरो बनगया!!!! बोला तो बोला.. जय महाराष्ट्र."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : राखी सावंतचं हे रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल! 17 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

संतोष जुवेकरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं आजवर ‘मोरया’, ‘झेंडा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तो लवकरच ‘छावा’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. त्यानिमित्तानं तिनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्याला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.