Dunki : शाहरुख खानच्या सीनवर कट! वॉर्निंगसोबत सेंसर बोर्डानं पास केला 'डंकी'

Shah Rukh Khan Dunki : शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटातील किंग खानचा एक सीन कट करत सेंसर बोर्डानं केलं पास.

दिक्षा पाटील | Updated: Dec 17, 2023, 06:52 PM IST
Dunki : शाहरुख खानच्या सीनवर कट! वॉर्निंगसोबत सेंसर बोर्डानं पास केला 'डंकी'  title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan Dunki : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. 'पठाण' आणि 'जवान' या  चित्रपटांनंतर बॉलिवूडचा बादशाह पुन्हा एकदा या कॉमेडी-ड्रामाद्वारे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. चाहत्यांच्या मते, शाहरुख या चित्रपटातून 2023 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपटाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज आहे. सेन्सॉर बोर्डाकडून थोड्या एडिटनंतर हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

सेन्सॉर बोर्डानं 'डंकी' ला U/A सर्टिफिकेट दिलं आहे, ज्यामध्ये कमीत कमी कट आणि भाषा आणि दृश्यांमध्ये काही बदल केले आहेत. राजू हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाचा रनटाइम म्हणजेच तुम्ही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर 2 तास 41 मिनिट पाहू शकणार आहात. ज्याला सेन्सॉर बोर्डानं या महिन्याच्या 15 तारखेला मान्यता दिली आहे. बोर्डानं चित्रपटाचं पुनरावलोकन केले, काही किरकोळ कट केले आणि त्याला रिलीजची परवानगी दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने विशेषत: शाहरुखचा सीन असलेल्या दृश्यांमध्ये कट केले आहेत आणि काही दृश्यांसाठी तर कायदेशीर चेतावणी जारी करण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि इनटर्व्हलनंतर, बोर्डाने धूम्रपान विरोधी आरोग्य स्पॉट्सचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहे. याव्यतिरिक्त, एका सीनमध्ये 'अप्रवासी' या शब्दाच्या जागी 'इमिग्रेंट्स' हा शब्द बदल करण्यास सांगितले आहे.

चित्रपटातील एका अत्यावश्यक सीनला आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही.' असा चेतावणीचा संदेश स्क्रीनवर लावणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विक्की कौशलच्या भूमिकेचे निधन झाल्यानंतर त्याची चिता जळतानाचा एक सीन दाखवण्यात आला आहे. मध्यंतरापूर्वी शाहरुख खान गणवेशात घोड्यावर स्वार होताना दिसत असलेल्या आणखी एका सीनल सेन्सॉर बोर्डाकडून विशेष सूचना मिळाल्या आहेत.

हेही वाचा : सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं हाक मारते करीना कपूर

राजू हिराणी दिग्दर्शित 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. परदेशात उदरनिर्वाह करू इच्छिणाऱ्या भारतीयांची कथा सांगणारा हा चित्रपट आहे. तर या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी आणि विक्रम कोचर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरनं चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.