शाहिद कपूरला सेन्सॉर बोर्डाचा धक्का, 25 टक्के इंटिमेट सीन्सवर चालवली कात्री

शाहिदचा आगामी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही इंटिमेट दृश्यांवर कात्री चालवल्याची माहिती समोर आली आहे. 

Updated: Feb 7, 2024, 07:58 PM IST
शाहिद कपूरला सेन्सॉर बोर्डाचा धक्का, 25 टक्के इंटिमेट सीन्सवर चालवली कात्री title=

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Censor Board : बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' अशी ओळख असलेला अभिनेता म्हणून शाहिद कपूरला ओळखले जाते. शाहिद हा लवकरच 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात झळकणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.  शाहिदचा आगामी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही इंटिमेट दृश्यांवर कात्री चालवल्याची माहिती समोर आली आहे. 

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात लव्हस्टोरी दाखवण्यात आली असून यात अनेक रोमँटिक सीन्सही दिसत आहेत. पण आता या चित्रपटातील 25 टक्के इंटिमेट दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवल्याचे बोललं जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद कपूरच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटातून काही इंटिमेट दृश्य हटवण्यात आले आहेत. या चित्रपटातील एक इंटिमेट दृश्य हे 36 सेकंदांचे होते. पण आता सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनंतर हे इंटिमेट दृश्य 9 सेकंदांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे हे दृश्य आता 27 सेकंदाचा असणार आहे. 

यासोबतच चित्रपटाचे काही संवादही बदलण्यात आले आहेत. या चित्रपटातील दारु हा शब्द काढून त्याऐवजी ड्रिंक्स हा शब्द टाकण्यात आला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना निर्देश दिले आहेत की ज्यावेळी धुम्रपानासंबंधित दृश्य असतील, तेव्हा तिथे मोठ्या अक्षरात हिंदीत धुम्रपान आरोग्यासाठी किती धोकादायक आहे, हे लिहावे लागणार आहे. तसेच CBFC कडून 2 फेब्रुवारीला तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटाला U/A सर्टीफिकेट देण्यात आले आहे. 

आणखी वाचा : '...म्हणून मला चॉकलेट बॉय ही ओळख आवडत नाही', शाहिद कपूरने केला खुलासा

दरम्यान 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. यात शाहिद हा रोबॉट शास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. तर क्रिती हे AI रोबॉटचे पात्र साकारत आहे. या चित्रपटात शाहिद हा  AI रोबॉट असलेल्या क्रितीच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर मग पुढे काय घडते अशी कथा यात दाखवली जाणार आहे.