अभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिसानिमित्त केली खास गोष्ट!

नुकताच सोनू सूदने त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.  सोनू सूदची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती.

Updated: Aug 1, 2023, 08:20 PM IST
अभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिसानिमित्त केली खास गोष्ट! title=

मुंबई : अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या उदारतेसाठी ओळखला जातो. या अभिनेत्याने कोरोनाच्या काळात लाखो लोकांना मदत केली आहे. त्यामुळेच त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी लोकं वेडे आहेत. नुकताच सोनू सूदने त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.  सोनू सूदची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती.

नुकताच सोनू सूदने म्हणजेच 30 जुलैला त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे.    हजारो चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहचले होते.  सोनूनेही आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत त्याच्या चाहत्यांसोबत केक कट केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता. मात्र त्याचा वाढदिवस आणखीन खास करण्यासाठी  SCF ने एक नवा उपक्रम राबवला. जाणून घेवूया.

या वर्षी सोनू सूदच्या वाढदिवसाचं औचित्य साधत एससीएफ (SCF) एक महत्त्वपूर्ण आणि तितकीच खास गोष्ट केली आहे.   समाजातील लोकांना प्रेम देऊन एकटेपणा दूर करण्यासाठी ही खास मोहीम करणार असल्याचं समजतं आहे.  यामगचा उद्देश दयाळूपणाचा प्रसार करणं आणि एकाकीपणाला प्रेमाने पराभूत करणं आहे. या खास कँपैनमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीने एक प्रेम , आपुलकी दर्शवण्यासाठी #MainBhiSonuSood या हॅशटॅगसह सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्याचं आव्हान केलं आहे. 

या खास मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्वोत्कृष्ट व्हिडिओंना आकर्षक बक्षीस दिलं जाणार आहे ज्यामुळे सगळ्यांना आनंद आणि  प्रेम मिळणार असून सोनूचा वाढदिवस या कारणाने खास होणार आहे. अभिनेता सोनू सूद याला वाढदिवसाची खास भेट म्हणून हे व्हिडिओ असणार आहेत.

SCF चा हा उपक्रम लोकांना त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि मदतीचा हात देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी असणार आहे. तुमच्या सदिच्छा कॅप्चर करा आणि SCF ला #MainBhiSonuSood सह टॅग करा अस देखील यातून सांगण्यात आलं आहे. एकत्रितपणे सूद चॅरिटी फाउंडेशन एक सकारात्मक प्रभाव निर्माण करून जगाला आनंदी करणार आहे.

नुकताच अभिनेत्याने आपला वाढदिवस त्याच्या चाहत्यांसोबत मोठ्या थाटामाटत साजरा केला आहे. अनेक चाहते सोनूला गिफ्ट म्हणून आपलं प्रेम देताना दिसले.. लोकांमध्ये असलेले त्याचे प्रेम आणि क्रेझ पाहून सोनू सूद भारावून गेला होता.  यादरम्यान चाहत्यांनी सोनू सूदसाठी चार मजली केकही आणला होता.