'देव करो तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासणार नाही...', Covid येताच सोनू सूद अॅक्टिव्ह

Sonu Sood नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना कोरोनापासून स्वत: चे रक्षण करा असे सांगितले आहे. 

Updated: Dec 24, 2022, 10:47 AM IST
'देव करो तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासणार नाही...', Covid येताच सोनू सूद अॅक्टिव्ह  title=

Sonu Sood Ready To Help Needy In Case Of Covid Disease : सध्या संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या (Covid -19) रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील प्रत्येक राज्यात कोरोनाचे रुग्ण असल्याचे दिवसेंदिवस कळत आहे. दोन वर्षांनंतर आता यंदाच्या वर्षी करोनाची तिसरी लाट पुन्हा आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून सगळ्यांनाच भीती वाटू लागली आहे. (Corona Virus) दरम्यान, 2020 मध्ये आलेल्या कोरोना व्हायरसच्या उद्रेका पासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा सगळ्यांच्या मदतीला धावून येत आहे. आता पुन्हा एकदा सोनू सूदनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबत सोनूनं गरजुंना मदतीचा हात देखील दिला आहे. 

सोनूनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनू म्हणाला, 'कोरोनापासून सावध राहा, घाबरू नका, देव करो तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासणार नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा.. नंबर एकच आहे'. सोनूनं फक्त ट्वीट करत ही माहिती दिली नाही तर त्यानं ETimes ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उघड केलं की अलीकडेच त्यांची स्वयंसेवक आणि टीमच्या काही सदस्यांसोबत एक मीटिंग घेतली जेणेकरून ते गरजूंची सेवा करण्यास तयार राहतील. कारण जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्यांच्याकडे सगळे प्लॅन्स हे तयार राहतील. 

सोनूनं खुलासा केला की, 'गेल्या काही दिवसांत आम्ही आमच्या स्वयंसेवकांच्या आणि आमच्यासोबत काम करणाऱ्या सर्व लोकांसोबत वेगवेगळ्या भागात आणि गावांमध्ये मीटिंग घेतल्या. गरज पडल्यास आम्ही त्यांना काहीही करण्यास तयार राहण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही कोणत्याही मदतीसाठी तयार आहोत. मग ती औषधे असोत, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असोत किंवा इतर काही आवश्यक गोष्टी. आपण जास्तीत जास्त लोकांना मदत केली पाहिजे. जो कोणी आमच्यापर्यंत पोहोचेल तो कोणताही कॉल खाली जाणाक नाही याची आम्ही काळजी घेऊ, आमच्या बाजूने जे शक्य आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू.”

हेही वाचा : 'आज सलमानसोबत असतीस तर...', Vicky Kaushal सोबत 'असा' प्रवास करताना पाहून Katrina Kaif ला चाहत्यांनी केल ट्रोल

2020 च्या लॉकडाऊन दरम्यान सोनू सूद मुंबई आणि भारतातील इतर शहरांमध्ये अडकलेल्या स्थलांतरितांसाठी आशेचा किरण बनला होता. त्याच्या प्रयत्नांमुळे लाखो लोकांना वाटेत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सुखरूप नेण्यात यश आले. 2021 मध्येही, सोनू आणि त्याच्या टीमनं मुंबईतील गरजू लोकांना मदत करणे सुरूच ठेवले. सोनू अनेकदा त्याच्या घराजवळील लोकांना भेटतो आणि त्यांना आर्थिक आणि वैद्यकीय दोन्ही मदत करतो. (sonu sood is ready to help the needy in case coronavirus disease makes a come back shared a post)