तापसी पन्नू को गुस्सा क्यों आता आहे? पापाराझींवर संतापली आणि कॅमेरासमोर नको ते बोलून बसली

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या खूप चर्चेत आहे.

Updated: Oct 27, 2022, 06:54 PM IST
तापसी पन्नू को गुस्सा क्यों आता आहे? पापाराझींवर संतापली आणि कॅमेरासमोर नको ते बोलून बसली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या खूप चर्चेत आहे. ती तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पण दरम्यानच्या काळात ती तिच्या वृत्तीमुळे लोकांच्या नजरेतही येत आहे. पापाराझींशी बोलतानाचे तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये ती ज्या पद्धतीने पापाराझींसोबत बोलताना दिसत आहे. ती पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती पापाराझींवर चिडताना दिसत आहे.

तापसीचा व्हिडिओ झाला व्हायरल
अनेकदा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये तापसी आणि पापाराझी यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. कधी ती पापाराझींना फटकारताना दिसते, तर कधी प्रेमाने बोलताना दिसते. आता तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती पापाराझींवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती पापाराझींना फोटो क्लिक करण्यास नकार देताना दिसत आहे. पापाराझींची छेड काढताना ती जबरदस्तीने फोटो काढण्यास नकार देते.

तापसी संतापली
तापसी पन्नूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की, तापसी एका बिल्डिंगमधून बाहेर येते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी पापाराझी तिच्याभोवती येऊ लागतात. पापाराझींना हे करताना पाहून ती म्हणते, 'हे भगवान, हे भगवान, अटॅक करु नका माझ्यावर. पुन्हा बोलाल ओरडते ही' 

जेव्हा ती तिच्या गाडीकडे जाऊ लागली. पापाराझी देखील तिच्या मागे गेले आणि ती तिच्या कारमध्ये बसायला गेली तेव्हा पापाराझींनी तिला पुन्हा पोज देण्यास सांगितलं. यावर ती चिडते आणि तापसी म्हणते, 'असं करू नका, असं करू नका प्लिज.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तापसी शाहरुख खानसोबत 'डंकी'मध्ये दिसणार आहे
तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची अनुराग कश्यपच्या 'दोबारा' चित्रपटात दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'ब्लर' आणि 'वो लड़की है कहाँ' सारखे चित्रपट आहेत.