ज्याचं कोणी नाही त्याची तापसी पन्नु, Outsiders साठी अभिनेत्रीनं ठेवली Grand Diwali Party!

तापसी पन्नूच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

Updated: Oct 21, 2022, 03:56 PM IST
ज्याचं कोणी नाही त्याची तापसी पन्नु, Outsiders साठी अभिनेत्रीनं ठेवली Grand Diwali Party! title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळीची पार्टी जोरात सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या इंडस्ट्रीतील मित्रांसाठी दिवाळी पार्टी दिली. या सगळ्या पार्ट्या स्टार्सनं भरलेल्या दिसत आहेत. अलीकडेच रमेश तौरानी, ​​क्रिती सेनन, मनीष मल्होत्रा ​​यांनीही दिवाळी पार्टी आयोजित केली होती, जिथे स्टार्सन हजेरी लावली. याशिवाय अभिनेत्री तापसी पन्नूनेही दिवाळी पार्टीचे आयोजन केले, परंतु तिने स्वत: पासून एक वेगळी सुरुवात केली आहे. तापसीनं दिवाळी पार्टीचे नाव आउटसाइडर्स दिवाळी पार्टी असे ठेवले आहे.

या पार्टीत काही आउटसाइडर्स कलाकारांशिवाय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांचीही गर्दी पाहायला मिळाली. यावेळी पार्टीत सरगुन मेहता आणि पती रवी दुबे, टिस्का चोप्रा, रकुल प्रीत सिंह, रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया, श्रेया सरन, रिद्धी डोगरा, मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर, संजना सांघी आणि एकता कपूर दिसले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, या आधी तापसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ आयुष्मान खुरानाच्या पार्टीतला आहे. या पार्टीत पोहोचलेल्या तापसीला पापाराझी म्हणाले आज ओरडू नका मॅम! त्यावर तापसीनं उत्तर दिलं की तुम्ही असं नाही वागलात तर नाही ओरडणार. तापसीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.