'माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड शॉकिंग होता' अभिनेत्री मृणाल दुसानिसचं धक्कादायक वक्तव्य

मृणालने माझिया प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून मनोरंजनसृष्टीत एन्ट्री घेतली होती.  अभिनेत्री शेवटची 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत दिसली होती. 

Updated: Apr 19, 2024, 07:32 PM IST
'माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड शॉकिंग होता' अभिनेत्री मृणाल दुसानिसचं धक्कादायक वक्तव्य title=

मुंबई : अभिनेत्री मृणाल दुसानिस ही अभिनेत्री अशा अभिनेत्रीपैकी आहे जिचा आजही खूप मोठा चाहता वर्ग आहे. गेली अनेक वर्षे अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक होती. त्यामुळे तिने कामातून ब्रेक घेतला होता. प्रेग्नंसीनंतर मृणालने हा ब्रेक घेतला होता. मृणालने माझिया प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून मनोरंजनसृष्टीत एन्ट्री घेतली होती. यानंतर तिने बऱ्याच सिनेमात मालिकेत काम केलं. आणि अवघ्या काही दिवसांतच ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागली. अभिनेत्री शेवटची 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिच्यासोबत शशांक केतकर शर्मिष्ठा राऊत, , विदिशा म्हसकर असे कलाकार दिसले होते. मात्र या मालिकेतील झालेला वाद आजही तितकाच चर्चेत आहे.

मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांनी वाहिनीचा आधार असतानाही कलाकारांचे पैसे थकवल्याचा आरोप करण्यात आला होता. याविषयी नुकतीच मृणाल मनमोकळेपणाने बोलली. नुक्तीचीच मृणालने  सेलिब्रिटी कट्टाला मुलाखत दिली. याविषयी बोलताना मृणाल म्हणाली, , 'त्या घटनेबद्दल आता बोलून खरंतर काहीच फायदा नाही. कारण, जो काही फायदा व्हायचा होता तो तेव्हा होणं गरजेचं होतं. मी त्या मालिकेत अतिशय मनापासून काम केलं होतं. त्यामुळे मी थोडीशी हळवी झाले होते. मी फारच नाजूक मनस्थितीत होते कारण, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करणं हा माझा स्वभाव कधीच नव्हता. 

पुढे मृणाल म्हणाली, ''कलाकारांचं कसं असतं… काम सुरूये तोपर्यंत त्यांना पैसे मिळत असतात एकदा काम संपलं की, पुढचं काम मिळेपर्यंत सगळं नियोजन करावं लागतं. माझ्या तेव्हा इन्व्हेस्टमेंट वगैरे काहीच नव्हत्या. जेव्हापासून मला कळू लागलं तेव्हापासून माझा खर्च मी करते. तेव्हा माझ्या वडिलांचे शेवटचे दिवस असूनही मला कुटुंबाला वेळ देता नाही आला. मी व्यवस्थित काम केलं. अशावेळी मोबदला मिळत नाही तेव्हा खरंच वाईट वाटतं. शशांकला त्याने पूर्ण दिले त्याचा टीडीएस राहिलाय. पण, तुम्ही इतरांना निम्मे तरी पैसे द्यायचे. आता यापुढे काम करताना आर्थिक बाबींवर मी आवर्जुन लक्ष ठेवणार आहे. आता मी इतर बऱ्याच प्रोडक्शन हाऊसबद्दल ऐकलंय अशी परिस्थिती सगळीकडे नसते.'' '

पुढे मृणाल म्हणाली ''मला याआधी काम करूनही असा अनुभव कधीच आला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड शॉकिंग होता. मला अनेकांनी आधीच अलर्ट केलं होतं की, इथे काम करू नकोस पण मी नाही ऐकलं. ही एक गोष्ट सोडली तर, तो उत्तम दिग्दर्शक आहे. माझी पहिली ऑडिशन त्यानेच घेतली होती. यापुढे, त्याच्याबरोबर प्रोडक्शन म्हणून मी काम करू शकणार नाही…मला भीतीच वाटले. पण, याव्यतिरिक्त दिग्दर्शक म्हणून सांगायचं झालं, तर तो ग्रेटच आहे.'' असं वक्तव्य मृणालने दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. सध्या अभिनेत्रीचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.