अमिताभ बच्चनवर भारी पडणारा 'हा' अभिनेता का राहिला मागे? सहकलाकारानं सांगितलं खरं कारण...

Amitabh Bachchan :  अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करताना त्यांना लोकप्रियतेत आणि इतरही गोष्टीत मागे टाकणारा हा अभिनेता आज का राहिला मागे? 

दिक्षा पाटील | Updated: Dec 21, 2023, 03:28 PM IST
अमिताभ बच्चनवर भारी पडणारा 'हा' अभिनेता का राहिला मागे? सहकलाकारानं सांगितलं खरं कारण... title=
(Photo Credit : Social Media)

Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा आज 21 डिसेंबर रोजी 60 वा वाढदिवस आहे. 90 च्या दशताकील लोकप्रिय कलाकारांपैकी गोविंदा एक आहे. गोविंदानं आजवर अनेक बड्या आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्याच्या डान्ससाठी त्यांचे लाखो चाहते आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी देखील त्याच्या चाहत्यांची यादी कमी झालेली नाही.  गोविंदाला 90 च्या दशकात खूप यश मिळालं असलं तरी आज गोविंदाला काम मिळत नाही आहे. त्यासाठी तोच जबाबदार असल्याचं गोविंदाचा सह-कलाकार टीनू वर्मानं सांगितलं आहे.  
 
टीनू वर्मानं 'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाच्या कामाविषयी खुलासा करत सांगितलं की गोविंदानं छोटे मियां-बडे मियां’, ‘राजा बाबू’ आणि ‘हीरो नंबर 1’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. पण त्याला काम न मिळण्यासाठी जबाबदर तो स्वत: आहे. तो कधीच कुठे वेळेवर पोहोचायचा नाही. लोक हे त्यांच्या पायावर कुऱ्हाड मारतात पण यानं स्वत:ची मान ही कुऱ्हाडीवर मारली आहे. त्याविषयी स्पष्ट गोष्टी बोलताना टीनू वर्मा ‘अचानक’ चा किस्सा शेअर करत म्हणाले, 'तो माणून बडे मिया छोटे मियामध्ये अमिताभ यांच्यावर भारी पडत होता. तो खूप छान अभिनेता आहे आणि प्रतिभावान सुद्धा. पण त्यानं वेळेला महत्त्व दिलं नाही, आज वेळ त्याला महत्त्व देत नाही. त्याचा एक किस्सा आहे. चित्रपटात अभिनेत्री मनीषा कोइराला आणि गोविंदा महत्त्वाच्या भूमिकेत होते. दोघांचा सीन शूट होणार होता. पण तो गोविंदामुळे झाला नाही. त्याच्या दिग्दर्शकाला त्याच्या या सवयीचा कंटाळ आला होता. त्यानंतर गोविंदानं वेळ मागितली आणि दुसऱ्याच दिवशी तो वेळेवर येईल. त्याला 11 ची वेळ दिली होती पण तो सेटवर पोहोचलाच नाही.'

याविषयी पुढे सांगताना टीनू म्हणाले की 'संध्याकाळी 4 वाजे पर्यंत त्यांनी क्रु मेंबर्ससोबत प्रतिक्षा केली. तर टीनू थकल्यानंतर मरीन ड्रायव्हवर खाण्या-पिण्यासाठी पोहोचला होता. तिथे त्यांनी पाहिलं की कॉलेजच्या गर्दीत ते पाहायला गेले तर आणि पाहिलं की गोविंदा परफॉर्म करत होता. तर जेव्हा गोविंदाची नजर टीनू यांच्यावर पडली तेव्हा तो तिथून पळाला.' 

हेही वाचा : Dunki पाहिल्यावर गौरी आणि अबरामला कसा वाटला? शाहरुखनंच सांगितलं

टीनू पुढे म्हणाले की 'गोविंदा एक अप्रतिम अभिनेता आणि डान्सर आहे. एककाळ होता जेव्हा प्रेक्षक त्याला चित्रपटात घेण्यासाठी फार उत्सुक असायचे. आता एक वेळ आहे जेव्हा लोकांना त्याला काम द्यायची नाही. कारण त्यानं वेळेला किंमत दिली नाही. त्यानं स्वत: त्याचं करिअर खराब केलं. तो दिवसात तीन शूट करायचा आणि तो तीनपैकी दोनच्या शूटवर पोहोचू शकायचा, एकावर पोहोचायचा नाही.'