Bernard Hill Death : 'टायटॅनिक' अभिनेता बर्नार्ड हिल यांचे वयाच्या 79 व्या निधन

Bernard Hill Dies : हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता बर्नार्ड हिल यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन. 'टायटॅनिक' आणि  'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' सिनेमातील भूमिका ठरल्या लोकप्रिय.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 6, 2024, 07:55 AM IST
Bernard Hill Death : 'टायटॅनिक' अभिनेता बर्नार्ड हिल यांचे वयाच्या 79 व्या निधन title=

Titanic Actor Bernard Hill Dies at 79: हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणले जाणारे बर्नार्ड हिल यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'टायटॅनिक' आणि 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' ट्रायोलॉजीमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. प्रसिद्ध स्कॉटिश गायिका आणि संगीतकार बार्बरा डिक्सनने यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

बार्बरा डिक्सनने काय लिहिले आहे?

तिच्या एक्स-पोस्टवर ही दुःखद बातमी शेअर करताना, बार्बरा डिक्सनने लिहिले की, "मला बर्नार्ड हिल यांच्या निधनाबद्दल खूप दुःख होत आहे. आम्ही जॉन पॉल जॉर्ज रिंगो आणि बर्ट, विली रसेलच्या मार्वलस शोमध्ये 1974 आणि 75 मध्ये एकत्र काम केले. खरंच तो एक अद्भुत अभिनेता होता. त्यांना भेटणे हा एक सौभाग्य होता.

या दु:खद बातमीनंतर चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक युझर्सनी त्यांच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा करत आहेत, तर बरेच लोक त्याच्या अभिनयातील बारकावे समजून घेण्याबद्दल लिहित आहेत.

कोणत्या चित्रपटात काम केले आहे?

बर्नार्डने केट विन्सलेट आणि लिओनार्डो डिकॅप्रिओच्या 1997 मध्ये आलेल्या 'टायटॅनिक' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात कॅप्टन एडवर्ड स्मिथची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांचे आजही कौतुक होत आहे. तुम्ही 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' पाहिला असेल तर तुम्हाला किंग थिओडेनचे पात्र नक्कीच आठवत असेल. बर्नार्ड हिल यांनीही या चित्रपटाच्या ट्रायोलॉजीमध्ये ही भूमिका केली होती.

टीव्ही शोमध्येही दिसले 

बर्नार्डने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. 1983 च्या 'बॉईज फ्रॉम द ब्लॅकस्टफ' या शोसाठी त्यांना बाफ्टा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी बीबीसी नाटक मालिका वुल्फ हॉल (2015) मध्येही अविस्मरणीय काम केले. याशिवाय तो 2008 मध्ये आलेल्या वॅल्किरी आणि 2002 च्या स्कॉर्पियन किंगमध्ये टॉम क्रूझसोबत दिसले होते.