'देहविक्रेय करणाऱ्या महिला, वेश्यालयांना बॉलिवूडमध्ये..'; अग्निहोत्रींचा भंन्साळींवर निशाणा

Vivek Agnihotri Criticise Sanjay Leela Bhansali For Heeramandi: पाकिस्तानमधील एका महिला डॉक्टरने संजय लिला भंन्साळींच्या नव्या वेब सिरीजसंदर्भात केलेल्या टीकेचा संदर्भ देत विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: May 6, 2024, 02:08 PM IST
'देहविक्रेय करणाऱ्या महिला, वेश्यालयांना बॉलिवूडमध्ये..'; अग्निहोत्रींचा भंन्साळींवर निशाणा title=
सोशल मीडियावरुन अग्नहोत्रींनी नोंदवलं मत

Vivek Agnihotri Criticise Sanjay Leela Bhansali For Heeramandi: प्रसिद्ध चित्रपटनिर्माते विवेक अग्निहोत्री यांनी पाकिस्तानी डॉक्टरचं कौतुक केलं आहे. या डॉक्टरने संजय लिला भंन्साळींच्या सध्या 'नेटफिक्स'वर ट्रेण्डींग असलेल्या 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजवर टीका केली आहे. या डॉक्टरने केलेली टीका विवेक अग्निहोत्रींना पटली असून त्यांनी या टीकेचा संदर्भ देत भंन्साळींवर आणि बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. तसेच क्रिएटीव्हिटीच्या नावाखाली किती स्वातंत्र्य बॉलिवूडमध्ये घेतलं जावं यासंदर्भाचतही अग्निहोत्री यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

पाकिस्तानी डॉक्टरने काय म्हटलंय?

हमाद नवाद नवाच्या महिलेने, "आत्ताच हिरामंडी वेबसिरीज पाहिली. त्यात हिरामंडी सोडून सर्व काही सापडले. एकतर तुम्ही तुमची कथा 1940 साली लाहोरमध्ये घडत असल्याच दाखवू नये, किंवा जर तुम्ही तसं केल असेल तर कथेत आग्र्याचा परिसर, दिल्लीची उर्दू, लखनवी कपडे आणि 1840 चं वातावरणात असा सेट दाखवू नये. माझ्यातला खरा लाहोरी स्वत: ला या साऱ्या खटकणाऱ्या गोष्टींकडे दूर्लक्ष करु देत नाही," असं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यावर विवेक अग्निहोत्री काय म्हणाले?

हमाद नवाद नावाच्या पाकिस्तानी महिला डॉक्टरने एक्सवर (ट्विटरवर) केलेली ही पोस्ट शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी टीका केली आहे. देहविक्रेय करणाऱ्या महिला, वेश्यालयांना बॉलिवूडमध्ये रोमॅण्टीक पद्धतीने दाखवलं जात असल्याच्या मुद्द्यावर अग्निहोत्रींनी आक्षेप नोंदवला आहे. "उत्तम टीका केली आहे. मी ही वेबसिरीज पाहिलेली नाही. मात्र मी लाहोरमधील हरमंडीला अनेकदा भेट दिली आहे. बॉलिवूडला देहविक्रेय करणाऱ्या महिला आणि वेश्यालयांना रोमँटीक पद्धतीने दाखवण्याची खोटच आहे. यामध्ये फार वाईट प्रकारे भाष्य करण्यात आलं आहे कारण वेश्यालये ही कधीच ऐश्वर्य, ग्लॅमर किंवा सौंदर्यचं प्रतिक नसतात. मानवाबरोबर झालेल्या अत्याचाराचा, दु:खाचा आणि भोगाव्या लागलेल्या त्रासाचे हे प्रतिक असतात. ज्यांना याची कल्पना नाही त्यांनी श्याम बेनेगल यांचा 'मंडी' चित्रपट पहावा," असा सल्ला अग्निहोत्री यांनी दिला आहे.

आपण हा प्रश्नही विचारला पाहिजे की...

"तसेच आपण हा प्रश्नही विचारला पाहिजे की, क्रिएटीव्हिटीच्या नावाखाली आपल्याला मानवी त्रास ग्लॅमराइज करुन दाखवण्याची परवानगी मिळते का? झोपडपट्टीमधील आयुष्य हे आनंददायी आहे हे दाखवणाचा चित्रपट बनवणं योग्य आहे का? झोपडपट्टीमधील व्यक्तीरेखा दाखवताना त्यांनी अंबानींच्या लग्नाला जात असल्याप्रमाणे कपडे परिधान केलेले आहेत, असं दाखवणं योग्य ठरतं का? कृपा करुन याबद्दल चर्चा करा," असं अग्निहोत्री यांनी सुचवलं आहे. 

चाहत्यांनी नोंदवली मतं

अग्निहोत्री यांच्या या विधानावर एकाने, "काहीही अती झालं की ते झेपत नाही. त्यांना (भंन्साळींना) क्रिएटीव्ह स्वातंत्र्य आणि सत्य यात समतोल साधता आला नाही," असं म्हटलं आहे. "बॉलिवूडमध्ये ट्रेण्ड नाही तर त्यांना देहविक्रेय करणाऱ्या महिला आणि वेश्यालयांना रोमॅण्टीक पद्धतीने दाखवण्याची सवय आहे. खास करुन आतचे चित्रपट असे आङेत. मात्र मला संजय लिला भंन्सालीमध्ये अडचण वाटते कारण त्यामध्ये केवळ ऐश्वर्य दाखवलं जातं. उमराव जान, बाझार थोडे समतोल राखणारे चित्रपट आहेत," असं अन्य एकाने म्हटलंय.