आई होणार दीपिका? ज्या साडीची सर्वात जास्त चर्चा तिनंच केली पोलखोल! जवळच्या सूत्रांनी केलं कन्फर्म

अभिनेत्री दीपिका आणि रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतात. ही बॉलिवूडची लाडकी जोडी आहे. मात्र लवकरच ही जोडी पालक बनणार असल्याचं बोललं जात आहे.

Updated: Feb 20, 2024, 07:32 PM IST
आई होणार दीपिका? ज्या साडीची सर्वात जास्त चर्चा तिनंच केली पोलखोल! जवळच्या सूत्रांनी केलं कन्फर्म title=

Deepika Padukone Pregnancy Rumours : वरुण धवन आणि नताशानंतर अजून एका सुपरस्टार जोडीच्या घरी पाळणा हलणार आहे. नुकताच एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार दीपिका प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे. आणि दुसऱ्या तिमाहीत आहे. असा दावा फक्त समोर आलेल्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे मात्र याबाबत अधिकृतपणे काहीच जाहीर करण्यात आलेलं नाही. 

का समोर येतायेत दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या बातम्या 
दीपिका आणि रणवीर लवकरच पालक होणार असल्याचं सतत बोललं जात आहे. मात्र यावेळ ही असं बोललं जाण्यामागचं कारण म्हणजे, दीपिकाने बाफ्टामध्ये नेसलेली शिमरी साडी. दीपिकाने शिमरी साडी परिधान करुन तिचं पोट कवर करताना दिसली. इतकंच नाही तर अभिनेत्रीने जे काही फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये दीपिकाने तिचं पोट साडीच्या पदराने कव्हर केलं आहे. 

मुलांविषयी बोलली जातेय ही गोष्ट
यावर्षाच्या सुरुवातीला दीपिकाने वोग सिंगापूरला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुलांविषयी एक वक्तव्य केलं होतं. अभिनेत्रीने यावेळी सांगितलं की,  ''आता आम्ही मुलांचं प्लॅनिंग करत आहोत.'' अभिनेत्री म्हणाली, ''रणवीर आणि मला आम्हा दोघांना मुलांची खूप आवड आहे. आता आम्ही आमचं कुटूंब वाढवण्याचा विचार करत आहोत. भलेही आज मी स्टार आहे मात्र घरी असं मला कोणीच ट्रीट करत नाही. यासगळ्यााधी मी एक बहिण आणि मुलगी आहे आणि मी हे कधीच बदलू इश्चित नाही. माझ्या परिवाराने मला नेहमीच जमिनीवर पाय ठेवणं शिकवलं आहे. मी आणि रणवीरदेखील आमच्या मुलांना वेल्यू देवू ईच्छितो.''

दीपिका-रणवीरचं वर्कफ्रंट
दीपिका पदुकोण अलीकडेच हृतिक रोशनसोबत 'फाइटर' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला होता. त्यात अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हरही मुख्य भूमिकेत होते. लवकरच दीपिका 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहे. रणवीर सिंगबद्दल सांगायचं झालं तर तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसला होता. लवकरच तो रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसणार आहे. दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूचं लाडकं कपल आहे. या दोघांचाही चाहतावर्ग खूप मोठा आहे. दिपीकाने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली की ती अवघ्या काही वेळातच ती व्हायरल होते.