मद्यपानच नाही तर हे पदार्थ खाल्ल्यावरही किडनी Infection चा धोका

तुम्हालाही हे पदार्थ खाण्याची जास्त सवय असेल तर आजच बंद करा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची   

Updated: Jul 1, 2022, 01:22 PM IST
मद्यपानच नाही तर हे पदार्थ खाल्ल्यावरही किडनी Infection चा धोका title=

मुंबई : किडनी हा शरीरातील एक छोटा भाग असला तरी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शरीरात किडनीचं कार्य सुरळीत सुरू राहाणं फार महत्त्वाचं आहे. कारण शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी त्याची मदत होते. शरीरातील ब्लड प्रेशर सुरळीत ठेवण्यासाठी ती मदत करते. 

आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्या म्हणण्यानुसार केवळ दारूनेच नाही तर काही खाद्यपदार्थांमुळे देखील किडनी खराब होऊ शकते. त्यामुळे आहारात काळजी घेणं गरजेचं आहे. अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या किडनीचं कार्य बिघडवू शकतात जाणून घेऊया. 

ह्या पदार्थांचं अति सेवन केल्याने किडनी स्टोन, इंफेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी या गोष्टी आहारातून टाळणं गरजेचं आहे. 

किडनी खराब होण्याची लक्षणं

भूक मंदावणे
शरीरात सूज येणं
अधिक थंडी वाजणं
त्वचेवर रॅश येणं
लघवीमध्ये अथळा येणं, त्रास होणं, लघवी नीट न होणं किंवा रंग वेगळा असणं
चिडचिडेपणा

किडनीसाठी नुकसान करणाऱ्या 5 गोष्टी कोणत्या

1. दारू- मद्यपान जास्त सेवन केल्यानं किडनी खराब होते. किडनीचं फंक्शन बिघडतं. त्याचा परिणाम मेंदूवरही होऊ शकतो. 

2. मीठ- मीठामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने किडनीवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे किडनीचं फंन्क्शन बिघडतं. 

3.डेअरी प्रोडक्ट - दूध, चीज, चीज, लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन किडनीसाठी चांगले नाही. दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे किडनी खराब होतात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम देखील खूप जास्त असते, ज्यामुळे मूत्रपिंडात दगड तयार होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे अतिसेवन टाळावं.

4.रेड मीट - रेड मीटमध्ये प्रथिने खूप जास्त असतात. आपल्या शरीरासाठी प्रथिने देखील आवश्यक असतात. आपल्या शरीराला असे मांस पचणे कठीण होते, ज्यामुळे किडनीवर परिणाम होतो.

5.आर्टिफिशियल स्वीट - बाजारात मिळणाऱ्या मिठाई, कुकीज आणि पेयांमध्ये कृत्रिम स्वीटनरचा अधिक वापर केला जातो, जो किडनीच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. मधुमेह असलेल्या लोकांना किडनीचे आजार होण्याची शक्यता जास्त असते.