24 तासांत किती दूध प्यावे? जास्त दूध पिणे पडू शकते महागात, फायद्याऐवजी होईल नुकसान

Side Effects of Drinking Too Much Milk: दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अतिप्रमाणात दूध प्यायल्याने त्याचे शरीराला तोटेही आहेत

मानसी क्षीरसागर | Updated: May 7, 2024, 06:15 PM IST
24 तासांत किती दूध प्यावे? जास्त दूध पिणे पडू शकते महागात, फायद्याऐवजी होईल नुकसान title=
health tips in marathi dangerous signs that you are drinking too much milk

Side Effects of Drinking Too Much Milk: दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक आजारांवर दूध मात करतं असंही सांगितले जाते. मात्र, कोणत्याही पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचा विपरीत परिणाम हा शरीरावर होतच असतो. तज्ज्ञांच्या मते, 24 तासांत किती तरुणांनी व जेष्ठ व्यक्तींनी किती दूध प्यावे, याची माहिती दिली आहे. तसंच, अतिप्रमाणात दूध प्यायल्याने शरीराला कोणते नुकसान होतात याबाबतही तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. 

तरुणांनी व जेष्ठांनी दररोज 2 ग्लास दूध प्यायले पाहिजे. त्यापेक्षा जास्त प्रमाणात दूध पिणे टाळावे. चहा, कॉफी आणि मिल्कशेकमध्येही दूधाची मात्रा याच्यापेक्षा जास्त नसावी. जर तुम्ही दही आणि पनीरचे सेवन करत असाल तर एक ग्लासच दूध प्यावे. नॅशनल इन्स्टीट्युड ऑफ हेल्थनुसार, दूधात प्रोटीन आणि व्हिटॅमिनसोबत फॅटदेखील असते. त्यामुळं शरीरात जास्त प्रमाणात फॅट जाते. ज्यामुळं हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज आणि हृदयरोगाचा धोका उद्भवू शकतो. कोणतीही पौष्टिक गोष्ट असली तरी स्वास्थवर्धक जरी असली तरी जास्त प्रमाणात घेतल्यास हानिकारक ठरू शकते. 

हाय कोलेस्ट्रॉल 

दूधाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास हाय कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते. कारण यात फॅट आणि कॅलरीची मात्रा अधिक असते. या दोघांच्या अत्याधिक सेवनाने शरीरातील एलडीएल म्हणजेच बॅड कॉलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. ज्यामुळं हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. 

हाडांना बळकटी 

दुधामुळं हाडांना बळकटी मिळते. मात्र, अतिप्रमाणात दूधाचे सेवन केल्यास हाडांचे नुकसान होते. कारण यात डी-गॅलेक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते. जे दुधात नैसर्गिकरित्या आढळली जाते आणि त्यामुळं हाडांचे नुकसान होते. परिणामी हाडं कमजोर होतात. 

मधुमेह 

अतिप्रमाणात दूधाचे सेवन केल्यास ब्लड ग्लुकोजच्या मात्रेत वाढ होते. ज्यामुळं मधुमेहाचा धोका वाढू शकतो. खासकरुन फुल क्रीम दूधाच्या सेवनाने ब्लड शुगर वाढण्याचा धोका अधिक असतो. 

वजन वाढण्याचा धोका

दूधात फॅटची मात्रा अधिक असते. हाय कॅलरीमुळं वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळं वेट लॉस करताना डेअरी प्रॉडक्ट आहारात सामील करु नका. 

फॅटी लिव्हर

दूधात असलेले फॅट लिव्हरलादेखील धोका पोहोचवू शकतात. त्यामुळं फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळं अतिप्रमाणात दूध पिणे टाळा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)