Sweating Remedies : चेहऱ्यावर येतो सर्वाधिक घाम, फायदेशीर ठरतील घरगुती अतिशय सोपे उपाय

Remedies For Sweating: अनेकांना संपूर्ण अंग सोडून फक्त चेहऱ्याला सर्वाधिक घाम येतो. यामुळे अनेकदा लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. याला नेमकी कारणे काय आणि घरगुती उपाय कोणते?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 26, 2024, 02:32 PM IST
Sweating Remedies : चेहऱ्यावर येतो सर्वाधिक घाम, फायदेशीर ठरतील घरगुती अतिशय सोपे उपाय  title=

Summer Heat :  होळीनंतर उन्हाळ्याला सुरुवात होतो. हाच उन्हाळा आता जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईचं तापमान 35 अंशावर गेलं आहे. पुढील 4 ते 5 दिवसात तापमानात आणखी 2 ते 3 अंशाची वाढ होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.  उष्ण आणि दमट परिस्थितीमध्ये नागरिकांना उन्हाचा फटका जाणवत आहे. अशावेळी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र असे असले तरीही चेहऱ्याला प्रचंड घाम येण्याची समस्या अनेकांना जाणवते. 

 

उन्हाळा अनेक समस्या घेऊन येतो. पण तुम्हाला सर्वात जास्त त्रास देणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे घाम, घामोळे-पुरळ आणि शरीराची दुर्गंधी. जरी काही लोक वर्षभर घामाच्या समस्येने त्रस्त असतात, परंतु बहुतेक लोकांना उष्ण आणि दमट हवामानात जास्त घाम येण्याची समस्या भेडसावत असते. जास्त घाम येणे हानीकारक नाही परंतु ते एखाद्या व्यक्तीला या घामामुळे लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात चेहऱ्यावर जास्त घाम का येतो आणि ते कोणत्या उपायांनी थांबवता येईल.

उन्हाळ्यात चेहऱ्याला जास्त घाम का येतो?

जरी उन्हाळ्यात घाम येणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे, परंतु जर एखाद्याला फक्त चेहऱ्यावर जास्त घाम येत असेल तर ती गंभीर समस्या असू शकतो. जास्त घाम येण्याच्या स्थितीला वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत 'हायपरहायड्रोसिस' म्हणतात. याशिवाय घाम येण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. जर आपण आकडेवारी पाहिली तर, 100 पैकी फक्त 2 किंवा 3 लोक या प्रकारच्या समस्येने ग्रस्त आहेत. घामाच्या ग्रंथींचा अति घाम येणे, हवामानातील बदल, ताणतणाव, काही औषधांचे अतिसेवन, मद्यपान, ड्रग्ज आणि धूम्रपान, याशिवाय रजोनिवृत्ती, लठ्ठपणा, मधुमेहाचा संसर्ग आणि कमी रक्तदाब यामुळेही चेहऱ्यावर जास्त घाम येतो.

प्रभावी घरगुती उपाय 

  • जर तुम्ही उन्हाळ्यात बाहेर जात असाल तर त्याआधी तुम्हाला ज्या भागात घाम येतो त्या भागावर बर्फ चोळा. यामुळे घाम येणे कमी होते.
  • उन्हाळ्यात जर तुमच्या चेहऱ्याला जास्त घाम येत असेल तर बटाट्याचे तुकडे करून ते चोळल्याने घामापासून आराम मिळतो.
  • चेहऱ्यावर जास्त घाम येत असल्यास काकडीचा रस लावा आणि काही वेळ तसाच राहू द्या. यानंतर, जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्हाला वाटेल की घाम कमी झाला आहे.
  • उन्हाळ्यात चेहऱ्यावर जास्त घाम येत असेल तर आहारातील मीठाचे प्रमाण कमी करा.
  • उन्हाळ्यात जास्त घाम येण्याच्या भीतीने अनेकजण पाणी कमी पितात त्यामुळे घामाला दुर्गंधी येऊ लागते. असे केल्याने घाम येणे कमी होत नाही पण शरीराची दुर्गंधी नक्कीच येते. त्यामुळे घाम आणि दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी शक्य तितके पाणी प्यावे.
  • उन्हाळ्यात तुमच्या चेहऱ्याला जास्त घाम येत असेल तर दिवसातून एकदा टोमॅटोचा रस प्या. यामुळे घामापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)