ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Basi Roti Benefits : अनेक घरातमध्ये शिळी चपाती खाल्ली जाते. तर काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शिळी भाकरी किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. शिळी चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत. 

नेहा चौधरी | Updated: Apr 21, 2024, 09:57 PM IST
ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे title=
What happens if you eat stale chapati Know the Basi Roti Benefits and disadvantages in marathi

Basi Roti Benefits in Marathi : आपल्या प्रत्येकाच्या घरात अनेक वेळा शिळी चपाती किंवा भाकरी खाल्ली जाते. धावपळीचा जीवनशैलीमध्ये नवरा बायको दोघेही नोकरी करतात. त्यात अनेक कार्यालयात शिफ्टमध्ये काम करावं लागतं. त्यामुळे प्रत्येक वेळी ताजी चपाती करणं शक्य नाही. त्यात आहारतज्ज्ञ सांगतात की, शिळं जेवण किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी चांगल नसतं. गरम गरम चपाती खाणे हे सगळ्यांनाच आवडतं पण शक्य नसतं. भारतीय खाद्यसंस्कृतीत अन्नामध्ये देवाचा वास असतो. त्यामुळे आपण शिळं अन्न कधीही फेकत नाही. त्यामुळे जर घरात शिळी चपाती किंवा भाकरी खाल्ल्यास आरोग्यास काय फायदा मिळतो आणि काय तोटे होतात. (What happens if you eat stale chapati Know the Basi Roti Benefits and disadvantages in marathi)

शिळी चपाती खाण्याचे फायदे!

पोषक

शिळ्या चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फायबर असल्याने हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असतात. 

भरपूर फायबर

शिळी चपाती फायबरचा खूप चांगला स्रोत असतात. शिळ्या चपात्यामध्ये ताज्या चपात्यापेक्षा जास्त फायबर असतात कारण चपातीमध्ये उपस्थित स्टार्च कालांतराने तुटतो आणि अधिक फायबर त्यातून तयार होतो. 

शरीराचे तापमान नियंत्रणात राहते

शिळ्या चपात्यांमध्ये शरीराचे तापमान टिकवून ठेवण्याची गुणवत्ता असल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

सहज पचण्यास सोपं

ताज्या रोट्यांपेक्षा शिळ्या रोट्या चांगल्या पचतात असं म्हणतात. त्यातील स्टार्च पाचक एन्झाईम्समध्ये प्रवेश करण्यायोग्य बनतो, ज्यामुळे शरीराला रोटी पचणे खूप सोपे होतं. 

शरीराची ताकद वाढण्यास मदत

शिळी चपाती आणि दूध घेतल्यास तुमची शरीराची ताकद वाढण्यास मदत मिळते. 

 

शिळी चपाती खाण्याचे तोटे!

शिळ्या चपात्या सहसा वेळ निघून गेल्याने त्याची चव कमी होते आणि ती आपल्या शरीरासाठी योग्य नसते.
शिळी चपात्या खाल्ल्यास तुम्हाला अन्नातून विषबाधा होण्याची भीती वाटते. इतकंच नाही तर जुलाब, उलट्या यासारख्या समस्याही होतात.
शिळी भाकरी खाल्ल्याने उलट्या होऊ शकतात. कारण शिळ्या चपात्यामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण वाढतात. 
कधीकधी शिळ्या चपात्यामध्ये बुरशी आणि बॅक्टेरियामुळे मळमळ किंवा उलट्या होण्याची भीती असते. 

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)