मलेरियासाठी असलेली सीबीसी चाचणी म्हणजे काय? ती कशी करतात?

World Malaria Day 2024 : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) नुसार मलेरिया काही प्रकारच्या मच्छरांमुळे हा जीवघेणा आजार होतो. पण या आजाराची लक्षणे काय? त्यासाठी केली जाणारी सीबीसी चाचणी कशी केली जाते. याबाबत न्यूबर्ग येथील अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी माहिती दिली. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 25, 2024, 11:15 AM IST
मलेरियासाठी असलेली सीबीसी चाचणी म्हणजे काय? ती कशी करतात? title=

तापमानात वाढ होताच मच्छरांची संख्या देखील वाढते. मच्छरांच्या चावण्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. मलेरिया अशाच एका गंभीर आजारांपैकी एक आहे. मलेरियाबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया डे (World Malaria Day 2024) साजरा केला जातो. अशावेळी मलेरियादरम्यान केल्या जाणाऱ्या सीबीसी चाचणीबद्दल जाणून घ्या.  न्यूबर्ग येथील अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.   

कम्प्लीट ब्लड काउंट (सीबीसी) चाचणी ही एक नियमित रक्त चाचणी आहे जी मलेरिया डासांच्या चावण्याने पसरणाऱ्या रोगाच्या तपासण्यासाठी वापरली जाते. योग्य उपचार होण्यासाठी मलेरिया झाल्याचे त्वरित लक्षात येऊन त्यावर उपचार होण्यासाठी महत्त्वाचे आहे.  जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला मलेरिया आहे किंवा तुमची  CBC चाचणी करण्याचे ठरले असेल तर, ही चाचणी कशासाठी आहे आणि त्यासाठी कसे तयार व्हावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सीबीसी चाचणी डॉक्टरांना मलेरियाची चिन्हे शोधण्यासाठी तुमच्या रक्ताच्या वेगवेगळ्या भागांची तपासणी  करण्यास मदत करते. मलेरियाचा तुमच्या रक्तातील रेड ब्लड सेल्स  (आरबीसी), व्हाईट ब्लड सेल्स (डब्ल्यूबीसी) आणि प्लेटलेट्सवर परिणाम होऊ शकतो,  जे सीबीसी चाचणी मध्ये बदल म्हणून दिसू शकतात.

  • रेड ब्लड सेल्स  (आरबीसी): मलेरियाचे परजीवी रेड ब्लड सेल्स  (आरबीसी) वर आक्रमण करून स्वतःचे प्रमाण वाढवू शकतात, ज्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. सीबीसी चाचणीमध्ये ॲनिमियाची लक्षणे मलेरियाशी निगडीत  आहेत का हे पाहण्यासाठी रेड ब्लड सेल्सची संख्या, हिमोग्लोबिन पातळी आणि हेमॅटोक्रिट यासारख्या गोष्टी तपासल्या जातात.
  • ईट ब्लड सेल्स (डब्ल्यूबीसी): जेव्हा तुम्हाला मलेरिया होतो, तेव्हा तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती परजीवींचा सामना करण्यासाठी अधिक पांढऱ्या रक्त पेशी पाठवते. लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स सारख्या विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशींमध्ये  होत असलेली वाढ  संसर्गातील सातत्य दाखविते. 
  • प्लेटलेट्स: मलेरियामुळे तुमच्या प्लेटलेटची संख्या कमी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला रक्तस्त्राव होण्याची अधिक शक्यता असते. सीबीसी चाचणीमुळे  प्लेटलेट पातळी कमी झाली आहे का हे समजते, जे मलेरियाचे लक्षण असू शकते.

मलेरिया तपासण्यासाठी सीबीसी चाचणीची तयारी

  • वेळ: जर तुमच्या डॉक्टरांनी सांगितले असेल, विशेषत: तुम्हाला ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी किंवा थकवा यासारखी लक्षणे असताना, शक्य तितक्या लवकर मलेरियाची चाचणी करून घ्या.
  • फास्टिंग: मलेरियासाठी सीबीसी चाचणीपूर्वी तुम्हाला सहसा उपवास म्हणजे फास्टिंग करण्याची गरज नसते, त्यामुळे तुम्ही चाचणीपूर्वी  खाऊ-पिऊ शकता.
  • औषधोपचार: मलेरियासाठी असलेल्या औषधांसह तुम्ही घेत असलेल्या इतर सर्व औषधांबद्दल तुमच्या डॉक्टरांना सांगा . काही औषधे सीबीसी परिणामांवर परिणाम करू शकतात, त्यामुळे अचूक माहिती देणे महत्त्वाचे आहे.
  • हायड्रेशन: हायड्रेटेड राहण्यासाठी चाचणीपूर्वी भरपूर पाणी प्या.  डीहायड्रेशनमुळे रक्त तपासणीच्या परिणामांवर परिणाम होऊ शकतो.
  • कपडे:  आरामदायक कपडे घाला,  जेणेकरून डॉक्टरांना तपासणीसाठी तुमच्या दंडातून सहजपणे रक्त घेता येईल.

सीबीसी चाचणी ही तुमच्या रक्तात झालेले बदल शोधून मलेरियाची तपासणी करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. चाचणीचा उद्देश समजून घेणे आणि तयारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने मलेरिया आढळल्यास अचूक परिणाम आणि त्वरित उपचार सुनिश्चित करण्यात मदत होऊ शकते. तुम्हाला मलेरिया झाल्याची शंका असल्यास किंवा सीबीसी चाचणीची आवश्यकता असल्यास, वैयक्तिक सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.