पॅन्टच्या मागच्या खिशात पाकिट ठेवण्याची सवय असेल, तर ती आताच बदला... करण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीला अशी सवय असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करायला हवी.

Updated: May 10, 2022, 06:11 PM IST
पॅन्टच्या मागच्या खिशात पाकिट ठेवण्याची सवय असेल, तर ती आताच बदला... करण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते title=

मुंबई : आपण हे पाहिलं आहे की, अनेक लोकांना आपलं पर्स हे आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवतात. महिलांमध्ये हे प्रमाण कमी आहे. परंतु बहुतांश परुष  मंडळी हे आपल्या खिशात पाकिट ठेवतात. हे सगळ्यांसाठी कॉमन असलं तरी, तुम्हाला माहिती आहे का, की असे करणे तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. पर्स मागील खिशात ठेवणे हे केवळ चोरीच्या दृष्टीनेच नाही तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूप धोकादायक आहे. पर्स मागच्या खिशात ठेवण्याची ही सवय तुमच्या शरीराच्या अनेक भागांना इजा करत आहे. चला तर जाणून घेऊ या की, ही सवय इतकी धोकादायक आहे.

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीला अशी सवय असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करायला हवी. खरं तर, ही सवय तुमच्या पाठीसाठी आणि तुमच्या बसण्याच्या स्थितीसाठी खूप धोकादायक आहे.

तज्ज्ञ सांगतात की, तुमच्या मागच्या खिशात पर्स घेऊन बसल्याने तुमच्या शरीरामध्ये असंतुलन निर्माण होते, ज्यामुळे तुमची वागण्याची, बसण्याची श्रोणि खराब होते. श्रोणि ही बेसिनच्या आकाराची रचना आहे जी तुमच्या शरीरातील पाठीचा कणा आणि पोटाच्या अवयवांना आधार देते.

याशिवाय पर्स मागे ठेवण्याच्या सवयीमुळे त्या भागात दुखणे, त्या भागाची झीज होणे आणि सायटिका इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सवयीमुळे ऑस्टियोआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढतो. हे दीर्घकाळ करण्याआधी सांधेदुखीचा त्रासही होतो.

केवळ मोठ्या किंवा जाड पर्समुळेच नुकसान होते असे नाही. याशिवाय लहान पर्समुळेही सायटीकाचा त्रास वाढू शकतो. अहवालात डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "जर तुम्ही तुमच्या पाकिटावर बसून 30 मिनिटे गाडी चालवली तर तुम्हाला पाठदुखी किंवा सायटॅटिक वेदनाची तक्रार होऊ शकते." अशा स्थितीत नेहमी पर्स समोरच्या खिशात किंवा पिशवीत ठेवा.