उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्या

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात गेल्या काहि दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 30, 2024, 01:11 PM IST
 उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्या title=
30 april 2024 Gold Price fall today on MCX silver check new rates in mumbai

Gold-Silver Rate Today: ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आज मंगळवार रोजी वायदे बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही घट झाल्याचे पाहायला मिळाले. MCXवर आज सकाळी 10.15च्या आसपास सोने 372 रुपये म्हणजेच 0.52 टक्क्यांनी घसरले. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71230 रुपये स्थिर झाली आहे. यावेळी चांदीचा दरदेखील 583 अंकांनी कोसळला असून सध्या 80,269 प्रति ग्रॅम असा आहे. 

आंतराराष्ट्रीय बाजारात काय आहे परिस्थिती?

सोन्याच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर उसळी घेतली आहे. डॉलरची नाजूक अवस्था असल्याने सोन्याच्या किंमतीत थोडा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर फेडरल रिझर्व्ह बँकेची पॉलिसीने आगामी बैठकीत लक्ष वेधून घेतले आहे. 30 एप्रिल म्हणजे मंगळवार रोजी सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 22 कॅरेट सोने 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला होता. मात्र महिना अखेपर्यंत सोन्याचे दर कोसळल्याने थोडा तरी दिलासा मिळाला आहे. 

सोन्या बरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे दिसून येते. चांदीचे दर ही 580 रुपयांनी कोसळले आहेत. एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे. 

सोन्याचे दर कसे असतील?

22 कॅरेटच्या एक ग्रॅम सोन्यसाठी ग्राहकांना 6,655 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 24 कॅरेटसाठी 7,260 रुपये 1 ग्रॅमसाठी मोजावे लागणार आहेत. 

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट    66,550 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72,600 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54,450 रुपये

मुंबईत कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 66,550 रुपये
24 कॅरेट- 72,600 रुपये
18 कॅरेट-54,450 रुपये