बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना करता येईल पीएचडी! यूजीसीचा मोठा निर्णय

UGC Decision For PhD: चार वर्षांच्या अंडरग्रेजुएट पदवी असलेले विद्यार्थी थेट NET ला बसू शकतात. 

Pravin Dabholkar | Updated: Apr 22, 2024, 06:53 PM IST
बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना करता येईल पीएचडी! यूजीसीचा मोठा निर्णय title=
UGC Decision For PhD

UGC Decision For PhD: तुम्ही बॅचलर डिग्रीला आहात? भविष्यात तुम्हाला पीएचडी करायची आहेयुनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजेच यूजीसीने नेट परीक्षेमध्ये मोठे बदल केले आहेत. आता चार वर्षांच्या अंडरग्रेजुएट पदवी असलेले विद्यार्थी थेट NET ला बसू शकतात. त्यांना पीएचडी करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. यूजीसीचे अध्यक्ष जगदेश कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली. असे असले तरी यासाठी 2 अटी विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागणार आहेत. 

सहाय्यक प्राध्यापक म्हणून मिळते नियुक्ती

ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती होण्यासाठी यूजीसी नेट परीक्षा घेतली जाते. यात उत्तीर्ण उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळते. तसेच त्यांना भारतीय विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेता येतो. आतापर्यंत, राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट देण्यासाठी उमेदवाराला किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक होते. 

16 जून रोजी परीक्षा

16 जून रोजी सर्व विषयांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यावर्षी ही परीक्षा संगणकावर आधारित चाचणीऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर यूसीने महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. त्यानुसार ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) सह किंवा त्याशिवाय पीएचडी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमात किमान 75 टक्के गुण किंवा समतुल्य ग्रेड आवश्यक असणार आहे.

सीए कसं बनायचं? किती मिळतो पगार?

पीएचडी करण्याची परवानगी

4 वर्षांच्या अंडरग्रेजुएट पदवी असलेले उमेदवार आता थेट पीएचडी करू शकतात आणि नेटसाठी बसू शकतात. उमेदवारांना ज्या विषयात पीएचडी करायची आहे त्या विषयात (चाचण्यांसाठी) बसण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती यूजीसीच्या वतीने देण्यात आली आहे.  तुम्ही 4 वर्षांचा किंवा 8 सेमिस्टरचा बॅचलर पदवी प्रोग्राम उत्तीर्ण केला आहात? यात तुम्हाला किमान 75 टक्के गुण आहेत मग तुमचा पीएचडी करण्याचा मार्ग आता सोपा झाला आहे. 

मुलाखतीवेळी 8 चुका अजिबात नका करु

5 टक्क्यांची सवलत

युजीसीच्या नियमानुसार एससी, एसटी, ओबीसी (नॉन-क्रिमी लेयर), भिन्न-अपंग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि इतर श्रेणीतील उमेदवारांना 5 टक्के गुण किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीची सूट सवलत दिली जाऊ शकते, अशी माहितीही देण्यात आली आहे.

दहावी उत्तीर्णांनो, भविष्यात IPS बनायचंय? मग या चुका अजिबात करु नकाच