स्मोकी बिस्किट खाणाऱ्या या चिमुकल्याचा खरंच मृत्यू झालाय? 'ही' आहे संपूर्ण कहाणी

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये स्मोकी बिस्किटं खाणाऱ्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Apr 22, 2024, 05:08 PM IST
स्मोकी बिस्किट खाणाऱ्या या चिमुकल्याचा खरंच मृत्यू झालाय? 'ही' आहे संपूर्ण कहाणी title=
child smokey biscuit eating toddler really dead This is the whole story Viral Video Fact Check

लहान मुलांना आकर्षित करणं अतिशय सोपं असतं. मॉल आणि जत्रेमध्ये मुलांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार नाना प्रकारच्या गोष्टी करतात. त्यातील एक स्मोकी पदार्थ...हे तुम्ही पाहिलं पण असेल किंवा यांचे व्हिडीओ पाहिले असतील. स्मोकी आइस्क्रीम, स्मोकी पान आणि सगळ्यात प्रसिद्ध स्मोकी ड्रिंक...(child smokey biscuit eating toddler really dead This is the whole story Viral Video Fact Check)

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामुळे एका जत्रेत स्मोकी बिस्किट खाल्ल्यानंतर तो मुलगा वेदननं विव्हळतोय. त्याच्या मदतीला काही लोक धावतात. पालक त्याला पाणी देतात पण तो अस्वस्थ झालेला पाहिला मिळतो. हा व्हिडीओ विचलित करणारा असल्याने आम्ही तो दाखवू शकतं नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. 

smokeybiscuit1

धक्कादायक म्हणजे हा व्हिडीओ शेअर करताना पालकांना सतर्क राहा आणि स्मोकी बिस्किटमुळे या मुलाचा मृत्यू झाला दावा केलाय. शिवाय अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांवर बंदी करण्याचं आवाहन यात करण्यात आले आहे. 
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ही घटना तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशातील असल्याचा दावा करण्यात आलाय. दुसऱ्या एका पोस्टमध्ये असं लिहिलंय की, ''पाहा कसं Dry Ice खातो आणि काही क्षणात तो जगाचा निरोप घेतो.'' दरम्यान हा व्हिडीओ फेसबुक आणि एक्सवर व्हायरल होत असलून लोक त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहे.

smokeybiscuit2

 

'या' चिमुकल्याचा खरंच मृत्यू झालाय? 

या व्हिडीओचा फॅक्ट चेक करण्यात आला आणि हा मुलगा स्मोकी बिस्किट खाऊ त्याचा मृत्यू झाल्याच सत्य तपासण्यात आला. त्यात असं आढळून आलं की, ही घटना नुकतीच कर्नाटकातील दावणगेरे या गावातील आहे. 
रिव्हर्स सर्चच्या मदतीने हा क्लू आणि व्हिडीओचा कीफ्रेम शोधल्यावर असं धक्कादायक घटना समोर आली. फॅक चेकमध्ये 18 एप्रिल 2024 ला कन्नड भाषेत प्रकाशित झालेली एक बातमी समोर आली. या बातमीत व्हायरल झालेल्या व्हिडीओची माहिती देण्यात आली होती. यात असं सांगण्यात आलं होतं की, दावणगेरेमधील एका प्रदर्शनात ही घटना घडली.

ज्यामध्ये स्मोकी बिस्किट खाल्ल्यानंतर मुलाची तब्येत अस्वस्थ झाली. या घटनेनंतर तात्काळ चिमुकल्याला पालकांनी जवळच्या रुग्णालयात नेलं आणि त्यावर उपचार करण्यात आले. या उपचारानंतर हा मुलगा बरा होऊन घरी गेल्याच सांगण्यात आलंय. 

स्मिकी पदार्थ बनवण्यासाठी कोरड्या बर्फ किंवा नायट्रोजन द्रवाचा वापर करण्यात येतो. हे बिस्किट खाल्ल्यानंतर तोंडातून धूर निघतो. दरम्यान घटनेचा व्हिडीओ पाहून पोलिसांनी पालकांशी संपर्क साधला मात्र त्यांनी तक्रार करण्यास मनाई केली. तरीदेखील त्या दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली आणि दुकान बंद करण्यात आलंय. शिवाय या घटनेबद्दल अन्न विभागालाही माहिती देण्यात आली आहे.