हात-पाय बांधून मारहाण, नको त्या ठिकाणी सिगारेटचे चटके, पत्नीचा पतीवर अघोरी अत्याचार कॅमेऱ्यात कैद

 Crime News : एका महिने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. 

नेहा चौधरी | Updated: May 6, 2024, 01:22 PM IST
हात-पाय बांधून मारहाण, नको त्या ठिकाणी सिगारेटचे चटके, पत्नीचा पतीवर अघोरी अत्याचार कॅमेऱ्यात कैद title=
Crime News smoking cigarettes in unwanted places Beating wife on husband caught on cctv up bijnor

Crime News in Marathi : पती पत्नीच्या नात्याला हादरवणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. पतीने नाही तर पत्नीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पत्नीचं हे भयानक रुप पाहून कुटुंबातील सदस्यांनाही जोरदार धक्का बसला आहे. या महिलेने अमानुषतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. बेडरुममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून सूनचं खरं रुप समोर आलं. 

क्रूरतेचा कहर!

17 नोव्हेंबर 2023 ला जोडप्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर पतीचं आयुष्य भयानक झालं होतं. त्यांची पत्नी राज रात्रीच्यावर अत्याचार करत होती. तिचं सत्य समोर आणण्यासाठी पतीने बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला. 29 एप्रिलला पत्नीने पतीला दुधातून नशेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याचे हात पाय बांधून त्याला विवस्त्र केलं. 

त्याच्या छातीवर बसून तिने त्याला मारहाण केली. एवढंच नाही तर त्याच्या प्रायव्हेट पार्टला सिगारेटचे चटके दिले. हा सर्व धक्कादायक आणि भयानक कृत्य सीसीटीव्हीत कैद झालं. पीडित तरुणाच्या वडिलांनी पोलिसांकडे सूनेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत पत्नीला अटक केलीय. 

कुठली आहे ही घटना?

उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील ही क्रूर घटना आहे. पीडित तरुणाचं नाव मेहर जहाँ तर आरोपीचं नाव मन्नान जैदी असं आहे. लग्नानंतर मन्नान पतीला सिगारेटचे चटके द्यायची. धक्कादायक म्हणजे तिने त्याच्यावर अनेक वेळा चाकूचे हल्लेही केले आहेत. दरम्यान पीडित पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

पीडित पतीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, लग्नापूर्वी मेहर लग्नापूर्वी प्रेमाचं खोटं नाटक केलं होतं. तिने मन्नान जैदीवर आपलं खूप प्रेम आहे म्हणून ती अनेक वेळा घरात येऊन कुटुंबाच्या लग्नासाठी हट्ट करायची. अखेर दोन्ही कुटुंबांनी मन्नान आणि मेहरचं मुस्लिम परंपरेनुसार निकाह लावून दिला.