दिल्लीतील ट्रॅफिकवर केंद्राचा २६० कोटींचा उतारा

अवघ्या १८ महिन्यांत ही योजना पूर्ण करण्याचे मंत्रालयाचे लक्ष्य आहे.

Updated: Aug 13, 2017, 09:06 PM IST
दिल्लीतील ट्रॅफिकवर केंद्राचा २६० कोटींचा उतारा title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील दिवसेंदिवस जटील होत चाललेल्या ट्रॅफीकवर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. त्यासाठी केंद्र एक मोहिमच हाती घेत असून, या मोहिमेपोटी सरकार २६० कोटी रूपये खर्च करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा सर्व निधी दिल्लीतील ट्रफीक कमी करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. 

सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्तेविकास आणि जहाजबांधनी मंत्री नितीन गडकरी या मोहिमेचे लॉंचींग करतील. उद्या (सोमवार,१४ ऑगस्ट) या मोहिमेची सुरूवात होईल. या मोहिमेअंतर्गत रस्तेविकास, रस्त्यांची रूंदी वाढवणे. अतिक्रमणे हटवने आदी गोष्टी केल्या जातील. 
प्राप्त माहितीनुसार, या मोहिमेसाठी १३ एकर जमीनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास देण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिल्याचे समजते. मोहिमेचे सर्व नियोजन पूर्ण झाले असून, ऑक्टोबर २०१७ पासून ही योजना गतीमान होईल. अवघ्या १८ महिन्यांत ही योजना पूर्ण करण्याचे मंत्रालयाचे लक्ष्य आहे.