4 सेकंद उशीर झाला नसता तर चांद्रयान 3 क्रॅश झाले असते; ISRO च्या वैज्ञानिकांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

 चांद्रयान 3 मोहिमेबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. लाँचींगला उशीर झाला नसता तर ही मोहिम फेल गेली असती. 

वनिता कांबळे | Updated: Apr 29, 2024, 11:46 PM IST
4 सेकंद उशीर झाला नसता तर चांद्रयान 3 क्रॅश झाले असते;  ISRO च्या वैज्ञानिकांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा  title=

Chandrayaan-3  : चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत अंतराळ क्षेत्रातली महापॉवर बनली आहे. Chandrayaan-3 मोहिमेतील  आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. 4 सेकंद  उशीर झाला नसता तर चांद्रयान 3 क्रॅश झाले असते. ISRO ची चांद्रयान 3 मोहिम फेल गेली असते असे   ISRO च्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे. एका रिपोर्टमध्ये या मोहिमेत आलेल्या मोठ्या संकटाचा खुलासा करण्यात आला आहे. 

14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून  2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. चांद्रयान 3 चा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने  गोळा केला आहे. 

Chandrayaan-3  मोहिमेबाबत मोठा खुलासा

Chandrayaan-3 च्या लाँचिंगसाठी चार सेकंद उशीरा झाला होता. प्रक्षेपणापूर्वी अवकाशात चांद्रयान 3 ला अडथळा ठरणाऱ्या स्पेस गार्बेज तसेत उपग्रहांचे निरीक्षण करण्यात आले. यामुळे चांद्रयान 3 ची अवकाशात गार्बेज तसेत उपग्रहाशी टक्कर होऊ नये यासाठी लाँचिंगची वेळ पुढे ढकलण्यात आली. यामुळे फक्त लाँचिंगची वेळच नाही तर चांद्रयान 3 ची दिशा देखील बदलण्यात आली होती. 

चांद्रयान-3 च्या आधी PSLV-C55/TeLEOS-2 चे प्रक्षेपण 22 एप्रिल 2023 रोजी एक मिनिट उशिराने करण्यात होते. याशिवाय, गेल्या वर्षीच PSLV-C56/DS-SAR चे प्रक्षेपण 30 जुलै 2023 रोजी एक मिनिट उशिराने करण्यात आले होते. रॉकेट आणि उपग्रह अवकाशातील ढिगारा तसेच उपग्रहांशी टक्कर होऊ नये यासाठी लाँचिग उशीरा केले जाते. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शुक्रवारी इंडियन स्पेस सिच्युएशनल असेसमेंट रिपोर्ट (ISSAR) 2023 सादर केला. या रिपोर्टमध्ये भारताच्या स्पेस मोहिमांबद्दल माहिती दिली जाते.