IAS Sucees Story | लहापणी वडिलांनी दाखवलेलं स्वप्न तिनं प्रत्यक्षात आणलं; कठीण परिश्रमानंतर UPSC उत्तीर्ण

UPSC Success Story | आयपीएस लकी चौहान या त्रिपुरा केडरच्या अधिकारी आहेत आणि सध्या त्या त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे एसपी म्हणून तैनात आहेत.

Updated: Jul 1, 2022, 01:05 PM IST
IAS Sucees Story | लहापणी वडिलांनी दाखवलेलं स्वप्न तिनं प्रत्यक्षात आणलं; कठीण परिश्रमानंतर UPSC उत्तीर्ण title=

मुंबई : IAS Sucees Story : लहानपणी वडिलांनी सांगितलेल्या एका कानमंत्रामुळे लकी चौहान आयपीएस अधिकारी बनल्या. आयपीएस लकी चौहान या त्रिपुरा केडरच्या अधिकारी आहेत आणि सध्या त्या त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे एसपी म्हणून तैनात आहेत.

लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा नावाच्या गावात लकी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रोहताश सिंह चौहान हे व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर आहेत. तर त्यांची आई सुमन लता चौहान या शिक्षिका आहेत. लकी यांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, लकी लहानपणापासूनच हुशार विद्यार्थीनी होती.

वडिलांनी लहानपणी दिलेला कानमंत्र ठरला ध्येयपूर्तीचा मार्ग

वडिलांनी त्यांना एसपी किंवा डीएम होण्याचा सल्ला दिला. हे स्वप्न तिने कायमस्वपरूपी मनाशी बाळगले. शालेय जीवनात तिला कोणीही विचारलं की, तुला मोठे झाल्यावर काय व्हायचंय? त्यावेळी ती अधिकारी व्हायचंय असं उत्तर देत असे. लकी यांनी बारावीत विज्ञान निवडले. यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्य आणि इतिहासात पदवी घेतली.

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, लकी सहायक कल्याण प्रशासक म्हणून काम करीत होती. आयपीएस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

लकी यांनी सरकारी नोकरीसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी कठोर परिश्रम केले आणि शेवटी तीन वर्षांच्या मेहनतीनंतर निवड झाली. लकीने 2012 मध्ये ऑल इंडिया रँक 246 मिळवला आणि त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

लकी यांची प्रशिक्षणादरम्यान परफॉर्मन्सच्या आधारावर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्रिपूरा केडरवर नियुक्ती केली. आतापर्यंत त्यांनी राज्यात अनेक महत्वाच्या पदांवर सेवा बजावली आहे. लकी सध्या त्रिपूरातील गोमती जिल्ह्याच्या एस.पी. आहेत.