फेसबुकपासून थ्रेड्स...तुमच्या अ‍ॅपमध्ये मेटाचे 'हे' नवं फिचर आलंय का?

Meta New Feature: एक युजर एकावेळी फेसबुक आणि थ्रेड्स दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 23, 2024, 02:29 PM IST
फेसबुकपासून थ्रेड्स...तुमच्या अ‍ॅपमध्ये मेटाचे 'हे' नवं फिचर आलंय का? title=
Facebook and Threads

Meta New Feature: आपला दिवसातील बराचसा वेळ फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेड्ससारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्क्रोलिंग करण्यात जातो. यूजर्स आपल्या या प्लॅटफॉर्मवर सातत्याने यावा यासाठी मेटादेखील स्वत:ला वेळोवेळी अपडेट करत असते. यामुळे युजर्सना वेळोवेळी फायदा होत असतो. मेटाने एक क्रॉस पोस्टिंग सुविधेचे परिक्षण सुरु केले आहे. ज्यामुळे युजर्सला फेसबुकहून थ्रेड्सवर पोस्ट शेअर करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ एक युजर एकावेळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात. 

कोणाला मिळणार सुविधा?

कंपनीने मीडियाला आपल्या परिक्षणाबद्दल माहिती दिली. ही सुविधा सध्या आयओएस यूजर्सला मिळतेय. यामध्ये यूरोपीय संघाचा समावेश नाही. ही सुविधा युजर्सला फेसबुकहून थ्रेड्सवर टेक्स्ट आणि लिंक दोन्ही पोस्ट करण्याची परवानगी देईल. 

युजरला प्रत्येकवेळी वेगळी पोस्ट आणि फोटो अपलोड करावा लागायचा. या प्रक्रियेमुळे अशा युजर्सला फायदा होणार आहे. 

थ्रेड्समध्ये मिळेल ट्रेंडिग टॉपिक फीचर 

फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सना आपले व्हिडीओ व्हायरल व्हावेत, असे नेहमी वाटत असते. यासाठी ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग टॉपिक शोधत असतात. पण आता युजर्सना यामध्ये आपला वेळ घालवण्याची गरज नाही.  मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी यासंदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली आहे. 

मेटाकडूनथ्रेड्सवर एक नवे  'ट्रेंडींग टॉपिक' फिचरचे परिक्षण करत आहे. प्लॅटफॉर्मवर कोणत्या गोष्टी ट्रेंडींगमध्ये आहेत, हे पाहण्याची सुविधा मिळू शकणार आहे. 

कंपनीने सुरुवातीला अमेरिकेतील युजर्ससाठी या सुविधेचे परीक्षण सुरु केले आहे. येथे आलेल्या प्रतिक्रियेनंतर अधिक देश आणि भाषांमध्ये ही सुविधा सुरु केली जाणार आहे.  झुकरबर्ग यांनी थ्रेड्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. 

अमेरिकेमध्ये थ्रेड्सवर आजच्या टॉप विषयांबद्दल परीक्षण सुरु केले जाणार आहे. एकदा हा प्रयोग यशस्वी झाला की इतर देश आणि भाषांमध्ये ही सुविधा सुरु केली जाणार असल्याचे झुकरबर्ग आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेट्स वापरणाऱ्या युजर्सना आता प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन वेगळी पोस्ट आणि फोटो अपलोड करण्याची गरज नाही. तसेच ट्रेंडिंग टॉपिकही इतरत्र शोधण्याची गरज नसेल.