आधी देवाला नमस्कार केला, परिक्रमा केली, नंतर बाजूच्या घरावर फेकले बॉम्ब... Video व्हायरल

CCTV : एका आरोपीने मंदिरात देवाला नमस्कार केला. त्यानंतर स्वत: भोवती फिरत परिक्रमा पूर्ण केल आणि त्यानंतर बाजूच्या घरावर दणादण बॉम्ब फेकले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून परिसरात एकच खळबळ ऊडाली आहे. 

राजीव कासले | Updated: May 8, 2024, 08:14 PM IST
आधी देवाला नमस्कार केला, परिक्रमा केली, नंतर बाजूच्या घरावर फेकले बॉम्ब... Video व्हायरल title=

MP CCTV : मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने चोरी, मारामारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गुन्हेगारांच्या वाढत्या कारवायांमुळे सामान्य माणसू भीतीच्या छायेखाली आहे. आता तर मध्य प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करणारी घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एकच खळबळ उडाली आहे. जबलपूरमध्ये एका आरोपीने एका घरावर चक्क बॉम्बने हल्ला केला. आनंद ठाकूर असं आरोपीचं नाव असून परिसरात दहशत पसरवण्यासाठी त्याने हे केल्याचं बोललं जातंय.

बॉम्ब हल्ल्याआधी देवाला नमस्कार
बॉम्बहल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. विशेष म्हणजे बॉम्ब फेकण्याआधी आरोपीने जवळच्या मंदिराला नस्कार केला. त्यानंतर बाजूच्या घरावर दोन बॉम्ब फेकले आणि गोळीबार करत तिथून फरार झाला. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार भारत कृषक यांच्या घरावर आरोपी आनंद ठाकूरने बॉम्ब हल्ला केला. आनंद ठाकूरने एकामागोमाग एक असे दोन बॉम्ब भारत कृषक यांच्या घरावर फेकले. यातला एक बॉम्ब फुटला. बॉम्बहल्ला करण्यापूर्वी आरोपी आनंद ठाकूरने जवळच्या मंदिरात जाऊ देवाला नमस्कार केला. त्यानंतर स्वत: भोवती फिरत परिक्रमा पूर्ण केली. 

सीसीटीव्हीत घटना कैद
या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. आरोपी आपल्या दोन्ही हातात बॉम्ब घेऊन चालत येताना दिसतोय. एक घराजवळ पोहोचल्यानंतर त्याने एकामागोमाग एक घरावर फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद ठाकूर याची परिसरात दहशत आहे. परिसरातील दुकानदार आणि सामान्य लोकांकडून तो गुंडा टॅक्स वसूल करतो. खंडणी दिली नाही तर त्यांना धमकावणं आणि मारहाण करणं असे प्रकारही त्याच्याकडे केले जातात. आता दिवसाढवळ्या बॉम्ब हल्ला केल्याने परिसरात दहशतीचं वातावरण आहे. 

ज्यांच्या घरावर बॉम्ब हल्ला झालाय, त्या भारत कृषक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.