सरकारच्या 'या' योजनेतून वाढणार तुमचे उत्पन्न; नितिन गडकरी यांनी सांगितला मास्टर प्लॅन

Nitin Gadkari New : नितीन गडकरी यांनी येत्या काळात रस्त्यांसाठी अशी योजना आणण्याची घोषणा केली आहे, ज्याचा तुम्हालाही फायदा होईल. भांडवल बाजारातून भांडवल गोळा करून सरकार रस्ते बांधणार असून, त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना परतावा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Updated: Jul 13, 2022, 08:23 AM IST
सरकारच्या 'या' योजनेतून वाढणार तुमचे उत्पन्न; नितिन गडकरी यांनी सांगितला मास्टर प्लॅन title=

नवी दिल्ली : Nitin Gadkari on Capital Market: होय, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या एका घोषणेने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात घोषणा केली की, रस्ते बांधणीशी संबंधित प्रकल्पासाठी सरकार लवकरच भांडवली बाजारातून पैसे गोळा करेल. म्हणजेच आता देशातील रस्ते विदेशी पैशाने नव्हे तर तुमच्या पैशाने तयार होतील आणि त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळेल.

गुंतवणुकीवर 8 टक्के परताव्याची हमी

गडकरी यांनी सांगितले की सरकार लवकरच लघु गुंतवणूकदार योजना आणणार आहे. यामध्ये सामान्य माणूस एक ते दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकणार असून त्याला त्याच्या गुंतवणुकीवर 8 टक्के परतावा दिला जाणार आहे. ते म्हणाले, जगभरातील मंदीच्या भीतीने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी पैसा उभा करण्यात कोणतीही अडचण नाही. ते म्हणाले, 'आता मी भांडवली बाजाराकडे वळणार आहे. मला आर्थिक संसाधने उभारण्यात कोणतीही अडचण नाही.

...अर्थ मंत्रालय या समस्येकडे लक्ष देईल

अशाप्रकारे बाजारातून रस्ते प्रकल्पांसाठी मोठी रक्कम उपलब्ध होणार असल्याचे गडकरी म्हणाले. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI) भांडवली खर्च निधीला धोका ठरतील का, असे विचारले असता गडकरी म्हणाले की, वित्त मंत्रालय या समस्येकडे लक्ष देईल. किंबहुना तेलाच्या किमती वाढल्यास सेस कमी होण्याची शक्यता बळावली आहे.

क्रूडच्या किमतीत वाढ झाल्याने अडचणी

NHAI च्या बजेट वाटपाचा मोठा भाग रस्ता आणि पायाभूत सुविधा निधीतून येतो, जो डिझेल आणि पेट्रोलवर लावलेल्या उपकरातून निर्माण होतो. गडकरी म्हणाले की, 'कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे 50,000 कोटी रुपयांचे बांधकाम उपकरण क्षेत्र अडचणीत आहे. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आम्हाला आर्थिक व्यवहार्यतेचा प्रश्न भेडसावत आहे.'