बजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी

Railway Stocks Rally: बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळावे. तर रेल्वेच्या बजेटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 1, 2024, 11:14 AM IST
बजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी title=
Railway Stocks IRFC RVNL IRCTC in Rally Before Budget 2024

Railway Stocks Rally: आज 1 फ्रेबुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहेत. मात्र बजेट सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळतेच. या दरम्यान रेल्वेच्या स्टॉक्समध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळतेय. IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअरने उसळी घेतली आहे. त्याचबरोबर इरकॉनचे शेअरही तेजीत आहेत. 

सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आज हिरव्या चिन्हासह उघडल्यांने गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला होता. मात्र, काहीच वेळानंतर पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक सकाळी 10 वाजता 121.37 अंकांनी उसळून 71,873.48 व्यवहार करत आहेत. तर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 14 शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. तर, 16 शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. निफ्टी 50 21 अंकानी वाढून 21,747.50 वर व्यवहार करतोय तर, एनएसईच्या 1,152 शेअर्सने उसळी घेतली आहे. तर, 1,050 शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. 

रेल्वेचे हे शेअर्स तुफान 

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये आज 3 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. 180.50 रुपये प्रती शेअर्सवर व्यवहार करत आहेत. या महिन्यात शेअर्सने 77 टक्के गुंतवणुकदारांना परतावा दिला आहे. रेल्वे विकास निगमच्या शेअर्सने आत 2.22 टक्के तेजी पाहायला मिळत आहे. तर, 315 रुपये प्रती शेअर्सवर व्यवहार करत आहेत. या महिन्यात या शेअर्सने 71 टक्के रिटर्न्स दिले आहेत. आयआरसीटीसीच्या शेअर्सने आज 1 टक्के उसळी घेत 986 रुपये प्रती शेअर्सवर व्यवहार करत आहेत. या स्टॉकने गुंतवणुकदारांना एका महिन्यात जवळपास 10 टक्के रिटर्न दिले आहे. 

रेल्वेचे हे स्टॉकही तेजीत

रेल्वेचे इतर स्टॉकबद्दल बोलायचे झाल्यास इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये आज सर्वसाधारण तेजी पाहायला मिळाली. सध्या इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर 239 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. गेल्या एका महिन्यात या स्टॉकने 35 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस देणारी देशातील दिग्गज कंपनी पेटीएमवर बुधवारी मोठी कारवाई केली आहे. आरबीआयच्या या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्सवरही मोठा परिणाम झाला आहे. गुरुवारी बजेटच्या दिवशी शेअर मार्केट उघडताच पेटीएमचा शेअर्स कोसळला आहे. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडचा शेअर सकाळी 9.15 वाजता 20 टक्के लोअर सक्रिटसह 609 रुपयांवर उघडला. यानंतर या शेअरची सुरुवात 152.20 रुपयेपर्यंत घसरली.