Sonu Soon जेव्हा इंस्टाग्राम स्टार Khaby Lame ला भेटतो, तेव्हा होतं असं की...! Watch Video

Khaby Lame Viral Video: सोशल मीडियावर खाबी लेम हा चेहरा कायम चर्चेत राहिला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्यासोबत दिसल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. व्हायरल व्हिडीओत या दोघांमध्ये ज्यूस सर्व्ह करताना मिश्किल वाद झाल्याचं दिसून आलं. 

Updated: Dec 15, 2022, 06:43 PM IST
Sonu Soon जेव्हा इंस्टाग्राम स्टार Khaby Lame ला भेटतो, तेव्हा होतं असं की...! Watch Video title=

Khaby Lame Viral Video: सोशल मीडियावर खाबी लेम हा चेहरा कायम चर्चेत राहिला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्यासोबत दिसल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. व्हायरल व्हिडीओत या दोघांमध्ये ज्यूस सर्व्ह करताना मिश्किल वाद झाल्याचं दिसून आलं. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सोनू सूद आणि खाबी सोफ्यावर एकत्र बसले आहेत आणि त्यांच्यासमोर बर्फाने भरलेले दोन ग्लास ठेवले आहेत. सोनू सूद हातात ज्यूसचा जार घेऊन असल्याचं दिसत आहे. त्यानंतर खाबीच्या ग्लासात ज्यूस ओततो आणि जवळपास संपून जातो. त्यानंतर उरलेला ज्यूस स्वत:च्या ग्लासात ओततो. 

खरं तर ज्यूस ओतल्यानंतर दोघांमध्ये प्रेमळ वाद सुरु होतो. माझ्या ग्लास तू घे आणि तो मी घेतो असं काहीसं वाटतं. पण शेवट काही वेगळाच होतो. खाबी सोनू सूदच्या ग्लासातून स्ट्रॉ एका झटक्यात घेतो आणि ज्यूस घेऊन निघून जातो. हा व्हिडीओ पोस्ट करताना खाबीनं लिहिलं आहे की, 'जेव्हा सोनूच्या ग्लासमधील स्ट्रॉ लक्ष वेधून घेतो.'आतापर्यंत हा व्हिडीओ 46 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओखाली डब्बू रतनानी, सुएश राय या स्टार्संनी कमेंट्स केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Khaby Lame (@khaby00)

बातमी वाचा- Viral: बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकरी आवाक्, Video पाहून तुम्हाही तसंच म्हणाल

सोशल मीडियावर 22 वर्षांचा हा तरुण दर दिवशी 145 कोटींची कमाई करत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ प्रमोट करण्यासाठी 50 लाखांपेक्षा जास्त चार्ज करतो. पहिला व्हिडीओ खाबी लेम यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये पोस्ट केला होता. हा व्हिडीओ 17 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला होता. खाबी लेम याचे व्हिडिओ लाईफ हॅकवर प्रतिक्रिया देण्यावर आधारित आहे. त्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर हसायला येतं. केवळ अभिव्यक्ती आणि हाताच्या हालचालींसह संपूर्ण व्हिडिओ सामग्री सादर करतात.